सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर व बफर क्षेत्रात समाविष्ट गावांमध्ये या क्षेत्रात काय करू शकता व काय करू शकत नाही, याची सविस्तर माहिती सर्व संबंधितांना देण्यास वन विभागाने आवश्यक ती कार्यवाही करावी, अशी सूचना पुणे विभागीय आयुक्त एस. चोक्किलगम यांनी येथे बोलताना केली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प स्थानिक सल्लागार समितीच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित केलेल्या बैठकीत चोक्कलिंगम बोलत होते. या बठकीस आमदार शिवाजीराव नाईक, आमदार सत्यजित पाटील, आमदार शंभूराज देसाई, जिल्हाधिकारी डॉ. अमित सनी, सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेंट बेंन, कराडचे विभागीय वन अधिकारी एम. एम. पंडितराव, कोल्हापूरचे विभागीय वन अधिकारी एस. एल. झुरे, मानद वन्यजीव रक्षक रोहण भाटे, सुनील भोईटे आदी मान्यवर उपस्थित होते.
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात २१ तर बफर क्षेत्रात ६० गावांचा समावेश असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या गावातील लोकांना सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर आणि बफर क्षेत्रानुसार आवश्यक उपाययोजना व निर्बंध यांची सविस्तर माहिती लोकप्रतिनिधींना तसेच गावक-यांना देणे गरजेचे असल्याचे या वेळी सांगण्यात आले. या बठकीत व्याघ्र प्रकल्पअंतर्गत निसर्ग पर्यटनाचे धोरण आणि आराखडा याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. तसेच स्थानिक सल्लागार समितीकडून करावयाच्या सनियंत्रणाबाबतही आजच्या बैठकीत सविस्तरपणे चर्चा करण्यात आली.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि मुख्य वनसंरक्षक व्ही. क्लेमेंट बेंन यांनी स्वागत करून बैठकीसमोरील विषय विशद केले. कोल्हापूर वन्यजीवचे विभागीय वन अधिकारी एस. एल. झुरे यांनी आभार मानले.
सह्याद्री व्याघ्र प्रकल्प क्षेत्रातील नियमांची माहिती देण्याच्या सूचना
सातारा, सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी या जिल्ह्यातील सह्याद्री व्याघ्र प्रकल्पाच्या कोअर क्षेत्रात २१ तर बफर क्षेत्रात ६० गावांचा समावेश
Written by अपर्णा देगावकर
आणखी वाचा
First published on: 19-09-2015 at 03:15 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Notice to rules information in the field of sahyadri tiger reserve area