कोल्हापूर महापालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या मंगळवारच्या पहिल्याच दिवशी ‘सव्‍‌र्हर डाऊन’चा कटू अनुभव उमेदवारांना आल्याने अर्ज दाखल करताना अडथळय़ाची शर्यत करावी लागली. राज्य निवडणूक आयोग व महापालिका प्रशासनाने आपली यंत्रणा सज्ज असल्याचा दावा वारंवार करूनही त्याचा फज्जा उडाल्याचे दिसून आले. या प्रकाराबाबत इच्छुक उमेदवारांसह राजकीय पक्षांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीची निवडणूक प्रक्रिया मंगळवारपासून सुरू झाली. नामनिर्देशन पत्र संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करावयाची आहेत. यासाठी महानगरपालिकेच्या वतीने राज्य निवडणूक आयोगाचे उपआयुक्त अविनाश सणस यांचे उपस्थितीत प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले होते. प्रत्यक्षात या शिबिराचा अर्ज दाखल करणाऱ्या उमेदवारांना काहीच फायदा झाला नाही.
नामनिर्देशन फॉर्म भरण्यासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जाऊन एकवेळ नोंदणी करणे आवशयक होते. प्रथमत: जाऊन नोंदणी करून युजर आयडी व पासवर्ड तयार करावयाचा. त्यानंतर ‘लॉग इन िवडो’मध्ये ‘युजर आयडी’ व ‘पासवर्ड’ वापरून लॉग इन होणे गरजेचे होते. मात्र, संकेतस्थळाचे सव्‍‌र्हर पहिल्याच दिवशी अपेक्षेप्रमाणे काम करत नव्हते. इच्छुक उमेदवार, त्यांना साहाय्य करणारे संगणक अभ्यासक हे नोंदणी करण्यासाठी सतत प्रयत्न करत होते. मात्र ‘सव्‍‌र्हर’ जाम झाल्याचा अनुभव दुपापर्यंत कायम होता. या कटू अनुभवामुळे इच्छुकांतून संतप्त प्रतिक्रिया उमटत होत्या. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष राजेश लाटकर यांनी आयुक्त पी. शिवशंकर यांची भेट घेऊन हा सारा गोंधळ निदर्शनास आणला. त्यांनी तत्काळ सुधारणा करण्याचे आश्वासन दिले. दुपारनंतर सव्‍‌र्हर सुरू झाला तरी काही िलक व्यवस्थित काम करत नाहीत, असे दिसून आले. एकूणच पहिल्या दिवशी निवडणूक विभागाच्या यंत्रणेचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.
उमेदवारांना अर्ज ऑनलाइन भरण्याबाबत काही शंका असल्यास ‘युटय़ूब’वर सदरचा अर्ज कसा भरावा याबाबतची चित्रफीत प्रसारित करण्यात आलेली आहे. शहरातील सायबर कॅफे चालक यांनाही प्रशिक्षण देणेत आले असून, त्यांच्याकडूनसुद्धा ऑनलाइन नामनिर्देशन फॉर्म, अ‍ॅफिडेव्हिट भरून घेता येऊ शकते, असे महापालिका प्रशासनाने स्पष्ट करूनही त्याचा काहीच उपयोग आज झाला नाही.
दरम्यान, महापालिकेची प्रशासकीय यंत्रणा मात्र उमेदवारी अर्ज दाखल करून घेण्यासाठी सज्ज होती. त्यासाठी महानगरपालिकेच्या वेबसाईटवर मॉडय़ुल प्रसिद्ध करण्यात आले आहे. तसेच ७ निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या कार्यालयात, महानगरपालिकेच्या ५ नागरी सुविधा केंद्रामध्ये मदत केंद्रे स्थापन करण्यात आली असून तेथे संबंधित अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा