लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या प्रशासक तथा आयुक्तपदी पल्लवी पाटील यांच्या नियुक्तीला गुरुवारी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरण (मॅट) ने स्थगिती दिली आहे. या पदावरील ओमप्रकाश दिवटे यांची नियुक्ती कायम राहिली आहे.
इचलकरंजी महापालिकेत दिवटे हे गेले वर्षभर आयुक्त पदावर कार्यरत होते. त्यांचा कार्यकाळ दोन वर्षाचा असताना अचानक मुदतपूर्व बदली झाल्याने यातील राजकारणाची जोरदार चर्चा होऊ लागली होती. या पदावर पल्लवी पाटील यांची नियुक्ती झाली होती. यावर दिवटे यांनी ‘मॅट’ मध्ये धाव घेतली होती. त्यांची बाजू ऐकून त्यांना स्थगिती देण्यात आली आहे.
आणखी वाचा-आमिर खानचा मुलगा प्रदर्शनापूर्वी गाजू लागला; ‘महाराज’ चित्रपटावर बंदी घालण्यासाठी कोल्हापुरात आंदोलन
एक दिवसाच्या आयुक्त
दिवटे हेच पुन्हा आयुक्त पदी असणार आहेत. त्यामुळे पल्लवी पाटील या एक दिवसाच्या आयुक्त राहिल्या असून त्यांना पूर्वीप्रमाणे सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पदावर कार्यरत राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.