कोल्हापूर : मुरगूड येथे आज झालेल्या दूधगंगा , वेदगंगा नदी बचाव कृती समितीच्या बैठकीत इचलकरंजी शहराला पाण्याचा पुरवठा करणाऱ्या सुळकुड पाणी योजनेला तीव्र विरोध करण्याचा एकमुखी ठराव करण्यात आला.
नगरपरिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात झालेल्या या बैठकीत बिद्री कारखान्याचे माजी उपाध्यक्ष प्रवीणसिंह पाटील म्हणाले , आमच्या पूर्वजानी रक्ताचे पाणी करून काळम्मावाडी धरण बांधले. आता इचलकरंजीला पाणी म्हणजे आमच्या गळ्याशी आले आहे. आमच्या लोकप्रतिनिधीनी या योजनेला विरोध केला पाहिजे. अन्यथा मते मागायला येवू नका, असा सज्जड इशारा दिला .
प्रास्ताविक नगराध्यक्ष, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेखान जमादार यांनी केले. यावेळी सागर कोंडेकर , धनराज घाटगे , बाळासो पाटील , दत्तामामा खराडे , शेखर सावंत , दिलीप चौगले , भगवान पाटील ,दगडू शेणवी यांची इचलकरंजी शहराला सुळकुड योजनेतून पाणी तीव्र विरोध दर्शवणारी भाषणे झाली. आभार रणजीत सूर्यवंशी यांनी मानले.