कोल्हापूर : महापुराचे गंभीर सावट दरवर्षी कोल्हापूर जिल्ह्यावर असते. कोल्हापूर जिल्ह्यात सर्वाधिक महापुराचा फटका शिरोळ तालुक्यात बसतो. याचे तालुक्यातील श्री क्षेत्र नरसिंहवाडी येथे १६ जूनला आंदोलन अंकुश, सांगली कृष्णा पूर नियंत्रणकृती समितीच्यावतीने पूर परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे , अशी माहिती आज पत्रकार परिषदेत देण्यात आली.
पूर नियंत्रणासाठी सांगली कृष्णा महापूर नियंत्रण कृती समिती तसेच आंदोलन अंकुश सातत्याने काम करतात त्या संघटना संभाव्य पुराच्या पार्श्वभूमीवर सध्या सक्रिय झाले असून कुरुंदवाड येथील टेनिस क्लब येथे सोमवारी पत्रकार बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीस जल अभ्यासक विजयकुमार दिवाण, आंदोलन अंकुश संघटनेचे प्रमुख धनाजी चुडमुंगे, सांगली कृष्णा पुर नियंत्रन कृती समितीचे निमंत्रक सर्जेराव पाटील, प्रदीप वायचळ, दीपक पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.
आणखी वाचा-महापूर प्रश्नी ७ जूनला कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयात बैठकीचे आयोजन
यावेळी धनाजी चुडमुंगे यांनी सांगितले की, पावसाळा सुरू झाला की जिल्हा प्रशासन महाराष्ट्र सरकार आपत्ती व्यवस्थापनाच्या बैठकी घेऊन सक्रिय राहतात आपत्ती व्यवस्थापनावर हजारो रुपये खर्च करण्यापेक्षा पूर येऊ नये यासाठी वर्षभर काम करणे गरजेचे आहे असे सांगून नरसिंह वाडी येथील विठ्ठल मंदिरात १६ जून रोजी पूरपरिषद घेण्यात येणार आहे. पुराचे कारणे, उपाययोजना कोणत्या कराव्यात यास अन्य जल अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. पूर परिषदेला मोठ्या संख्येने उपस्थित राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. यावेळी संजय कोरे सुयोग हावळ महादेव काळे, आप्पासाहेब कदम , राकेश जगदाळे , महिपती बाबर आदी उपस्थित होते.