लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कोल्हापूर: इचलकरंजीसाठी सुळकुड उद्भव दुधगंगा पाणी योजना राबवण्याबाबत व्यापक बैठक घेवून मार्ग काढण्यात येईल, असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शनिवारी आमदार प्रकाश आवाडे यांच्या मागणीवर दिले.

इचलकरंजी शहराची लोकसंख्या, वाढते औद्योगीकरण व नागरीकरण यामुळे पाणी पुरवठा करण्यावर मर्यादा येत आहेत. भविष्यातील लोकसंख्या व पाण्याची गरज लक्षात घेता सुळकुड येथून दुधगंगा नदीवरून योजना राबविण्यास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शासकीय मान्यता देवूनही काम अद्याप सुरू झालेले नाही. त्यातच कागल तालुक्यातील मंत्री, आजी-माजी लोकप्रतिनिधींनी योजना होऊ देणार नाही अशी भूमिका घेतली आहे. इचलकरंजीतील नागरीकांचे पाण्यासाठी होणारे हाल पाहता ही योजना लवकरात लवकर पुर्णत्वास नेणे गरजेचे आहे. कागल तालुक्यातील सर्वच लोकप्रतिनिधींसह संबंधितांची बैठक तात्काळ घेऊन हा प्रश्‍न मार्गी लावावा, अशी मागणी आमदार आवाडे यांनी केली.

आणखी वाचा-जयप्रभा स्टुडिओ ताब्यात घेण्याचा शासनाचा निर्णय; कोल्हापुरात कलाकारांचा जल्लोष

यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या संदर्भात मंत्री हसन मुश्रीफ, समरजितसिंह घाटगे, खासदार संजय मंडलिक, संजय घाटगे यांच्यासह संबंधितांची बैठक घेऊन मार्ग काढण्याची ग्वाही दिली आहे, असेही आवाडे यांनी सांगितले.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Organizing a comprehensive meeting regarding ichalkaranji sulkud water scheme says chief minister eknath shinde mrj
Show comments