कोल्हापूर: राज्य सरकारने शेतीच्या पाणीपट्टीत दहापटीने दरवाढ केली असून कृषीपंपाना जलमापक यंत्र ( पाणी मीटर ) बसविले जाणार आहेत. हे निर्णय तातडीने मागे न घेतल्यास मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्र्यांना कृष्णेच्या पाण्याची आंघोळ घालणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनी बुधवारी शिरोली ता. हातकंणगले येथे पुणे बंगळुरू महामार्गावरील आंदोलनादरम्यान दिला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र राज्य इरिगेशन फेडरेशन यांच्यावतीने सांगली कोल्हापूर व सातारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्यावतीने वाढीव पाणीपट्टीविरोधात पुणे बंगळुरू महामार्ग रास्ता रोको आंदोलन आज करण्यात आले. दरम्यान आंदोलनस्थळी पाटबंधारे विभागाचे अधिकारी यांनी भेट देऊन सरकारने याबाबत ६ नोव्हेंबर रोजी बैठकीचे लेखी पत्र दिले. यानंतर रास्ता रोको आंदोलन मागे घेऊन ६ तारखेनंतर पुढील आंदोलनाची दिशा जाहीर करण्याचे ठरले.

हेही वाचा – जनतेसाठी जीवन समर्पित करणारा नेता गमावला; राहुल गांधी यांनी पी. एन. पाटील यांच्या विषयी व्यक्त केल्या शोकभावना

एकीकडे सरकार शेतकऱ्यांवर अन्याय करणारे तुघलकी निर्णय घेऊ लागले आहेत. तर दुसरीकडे शेतीमाल कवडीमोल दराने विकला जात आहे. दहापट वाढीव पाणीपट्टी करणारे सरकार एफ. आर. पी मध्ये तोडमोड करून तुकड्याने शेतकऱ्यांना ऊस बिले अदा करत आहेत. याबाबत सरकार मुग गिळून गप्प बसले असून पाणीपट्टी मात्र एक रक्कमी वसुलीचा तगादा लावला आहे. तोट्यातील शेतीमुळे शेतकरी मेटाकुटीस आलेले आहेत. यामुळे सरकारने तातडीने याबाबत निर्णय घेऊन हे तुघलकी निर्णय मागे घ्यावे, असे राजू शेट्टी म्हणाले.

हेही वाचा – भरघाव वेगाने मोटार चालवून अपघातास कारणीभूत ठरलेल्या इचलकरंजीतील युवकावर गुन्हा दाखल

यावेळी श्रमिक मुक्ती दलाचे भारत पाटणकर, आमदार सतेज पाटील, आमदार अरूण लाड, मजी आमदार संजय घाटगे, इरिगेशन फेडरेशनचे विक्रांत पाटील किणीकर यांच्यासह सांगली सातारा व कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने ऊपस्थित होते.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Otherwise all the ministers including the cm will be bathed in krishna water says raju shetty ssb
Show comments