कोल्हापूर : वृक्षांची दाटी असलेल्या आणि वैशिष्ट्यपूर्ण वृक्ष आढळत असलेल्या कोल्हापूर शहरात आणखी एका नव्या झाडाचा आढळ झाला आहे. पायमोजाचे झाड कोल्हापुरात दिसून आले आहे. त्याची कोल्हापूर वनस्पती कोशामध्ये नोंद करण्यात आली आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
कोल्हापूर शहरातील मध्यवर्ती सी. पी. आर.समोर असलेली बाग म्हणजे टाऊन हॉल उद्यान. टाऊनहॉल इमारतीच्या सभोवतालच्या ७-८ एकर परिसराचे उद्यानात रूपांतर केले आहे. ते अनेक दुर्मिळ देशी खासकरून विदेशी वृक्षांनी समृद्ध आहे. या उद्यानात एकूण ९४ प्रकारचे वृक्ष पाहायला मिळतात. त्यातील कोल्हापूर शहरात एकमेव असलेला पायमोज्याचा वृक्ष यावर्षी पहिल्यांदाच बहरला आहे. अशी माहिती वनस्पती तज्ञ डॉ. मकरंद ऐतवडे यांनी दिली आहे. निसर्गप्रेमी धनश्री भगत आणि परितोष उरकुडे यांनी टाऊन हॉल उद्यानातील झाडाखाली पडलेल्या फुलांचे फोटो डॉ. मकरंद ऐतवडे यांना पाठविले होते.
आणखी वाचा-“सर्व भरती प्रक्रिया राज्यसेवा आयोगाकडून करावी”, राजू शेट्टी यांची अजित पवारांकडे मागणी
प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली असता पायमोज्याच्या झाडाचीच फुले फुलल्याचे लक्षात आले. यापूर्वी या वृक्षाला कधीही फुले आली नसल्याने त्याची शास्त्रीय दृष्ट्या पुष्टी झाली नव्हती. यंदा या झाडाला फुले आल्याने अभ्यासाअंती त्याची रीतसर पुष्टी करण्यात आली आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या वनस्पती कोशामध्ये या वृक्षाची नोंद नाही. त्यामुळे कोल्हापूर जिल्ह्यासाठी या वृक्षाची प्रथमच नोंद होत आहे.
हा वृक्ष मुळचा लॅटिन अमेरिकेतील पेरू या देशातील असून व्हेनिझुएला, ब्राझील, साल्वाडोर या देशांतील नैसर्गिक जंगलामध्ये १०० फुटांपेक्षाही जास्त उंच वाढतो. याचे शास्त्रीय नाव मायरोझायलॉन बालस्यामम असून तो पळस कुळातील वृक्ष आहे. याला पेरू बाल्सम, टोलू बाल्सम अशी इंग्रजी नावे आहेत. दक्षिण अमेरिकेतील काही देशांमध्ये ‘सँनटोस् महोगनी’ अशीही या वृक्षाची ओळख आहे. या झाडाच्या शेंगा पायमोज्याच्या आकारासारख्या असल्याने यास ‘पायमोज्याचे झाड’ असे मराठी नाव. शेंग खाली पडताना हेलिकॉप्टरसारखी गरगरत येऊन जमिनीवर पडते. हा वृक्ष भारतात मुंबई, बेंगलोर येथील लालबाग उद्यान, निलगिरी हिल्समधील कलगार उद्यान व दक्षिण भारतातील काही उंच भागांमध्ये शोभेसाठी लावण्यात आला आहे.
हा वृक्ष सदाहरित आहे. याच्या खोडामध्ये रेझीन असून त्यास तुळशीच्या पानांसारखा वास येतो. याची पाने संयुक्त आणि एक आड एक असतात. फुलोरे पानांच्या बेचक्यात येत असून फुले लहान असून ती पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. फुलातील पाच पाकळ्यांपैकी एक पाकळी मोठी असून उर्वरित चार नाजूक व लहान असतात. फळ शेंगाधारी असून पंखधारी शेंगांच्या टोकाला एकच बी असते. बिया किडनीच्या आकाराच्या असतात.
आणखी वाचा-जखमा अजुनी ओल्या; संभाजीराजे छत्रपती यांचे लोकसभा निवडणूक लढवण्याचे संकेत
या वृक्ष्याच्या खोडातील सुगंधी चिकट पदार्थाचा (रेझीन/बालसम) उपयोग त्वचारोगांवर आणि कफ सिरपमधेही होतो. हा सुगंधी बालसम ॲन्टीसेप्टिक गुणांचा असून तो उत्तेजक आहे. खोडापासून सुगंधी तेल काढतात. या तेलाचा उपयोग विविध सौन्दर्यप्रसाधने, परफ्युम व साबणात वापर होतो. या वृक्षाचे लाकूड हे खऱ्या महोगनीपेक्षाही गडद रंगाचे असून त्यास किंमतही जास्त मिळते. याचे लाकूड सहसा कुजत नसल्याने त्याचा उपयोग घरातील जमिनीसाठी, फर्निचरसाठी व पॅनलिंगसाठी होतो. या वृक्षाची लागवड ही मुख्यत्वे बीपासूनच होते.
“कोल्हापूर जिल्ह्यासाठी अलीकडील काळात अनेक वृक्ष नव्याने नोंद होत आहेत. यातील बहुसंख्य वृक्ष हे विदेशी असून ते दुर्मिळ आहेत. त्यामुळे अशा दुर्मिळ वृक्षांना वारसा वृक्षांचा दर्जा दिला गेला पाहिजे. जेणेकरून शहर परिसरातील दुर्मिळ वृक्ष संपदेचे जतन आणि संवर्धन होण्यास हातभार लागेल.” -डॉ. मकरंद मोहनराव ऐतवडे