कोल्हापूर : इचलकरंजी महापालिकेच्या आयुक्त पदाचा खो खो चांगलाच रंगला आहे. महापालिकेच्या आयुक्तपदाची सूत्रे आज सातारा जिल्हा प्रशासन अधिकारी पल्लवी पाटील यांनी स्वीकारली. यापूर्वी एकदा या पदावर त्या अल्पकाळ विराजमान झाल्या होत्या.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

इचलकरंजी महापालिकेतील आयुक्त पदाच्या राजकारण रंगात आले आहे. ओमप्रकाश दिवटे यांची दीड वर्षांपूर्वी महापालिकेचे दुसरे आयुक्त म्हणून नियुक्ती झाली होती. तथापि, स्थानिक राजकारणातून या पदावर सातारा जिल्ह्यातील पल्लवी पाटील यांची गतवर्षी ६ डिसेंबर रोजी नियुक्त झाली होती. त्यावर ओमप्रकाश दिवटे यांनी मॅटमध्ये धाव घेतल्यानंतर पाटील यांच्या नियुक्तीला दुसऱ्याच दिवशी स्थगिती मिळाली. पुन्हा दिवटे यांनी सूत्रे हाती घेतली.

गेल्या आठवड्यात दिवटे यांच्याकडील महापालिकेच्या प्रशासक पदाचा पदभार काढून घेण्यात येऊन ही जबाबदारी जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. त्यानंतर दिवटे यांनी बदलीच्या हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत होते. आज तीन महिन्याच्या अवधीनंतर पल्लवी पाटील यांनी आयुक्त पदाची सूत्रे हाती घेतली आहेत. नूतन आयुक्त पल्लवी पाटील यांचे स्वागत उपायुक्त स्मृती पाटील, सहाआयुक्त विजय राजापूरे, आरोग्य अधिकारी सुनीलदत्त संगेवार आदींनी केले.