सीमाभागातील राजहंस गडावर रविवारी होणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याच्या दुग्धाभिषेकासाठी शुक्रवारी येथील पंचगंगा नदीचे जल नेण्यात आले.मध्यवर्ती महाराष्ट्र एकीकरण समितीच्या वतीने बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर राजहंस गडावर छत्रपती श्री शिवाजी महाराज दुग्धाभिषेक सोहळा १९ मार्च रोजी भव्य प्रमाणात आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यासाठी सात नद्यांच्या जलाशयाने जलाभिषेक करून महाराजांना मुजरा करण्यात येणार आहे.
त्या अनुषंगाने आज येथील पाच नद्यांचा संगम आसलेल्या पंचगंगा नदीचे जलपूजन केले. कलश पुजन केल्यावर छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या जयघोष करण्यात आल. नरसोबावाडी येथील पंचगंगा, वारणा आणि कृष्णा नदी तिहेरी संगमावर विधिवत पूजा करून गुरूदेव दत्तांचा आशिर्वाद घेतला. खानापूर येथील मलप्रभा नदीचे जल आणले गेले. येळ्ळूर विभाग महाराष्ट्र एकीकरण समितीचे कार्याध्यक्ष दुद्दाप्पा बागेवाडी, सरचिटणीस प्रकाश अष्टेकर, उपाध्यक्ष राजू पावले, महेश जुवेकर, दता उघाडे यांनी पाच कलशातून जल नेले.