कोल्हापूर : पंचगंगा नदीला काळेकुट्ट दुर्गंधीयुक्त पाणी आले आहे. या दुषित पाण्याची पाहणी करण्यासाठी शिरोळ तालुक्यात आलेल्या प्रदुषण नियंत्रण मंडळाचे क्षेत्र अधिकारी सचिन हरबड यांना स्वाभिमानी संघटनेचे बंडू पाटील, विश्वास बालीघाटे यांनी दुषित पाणी पाजवण्याचा प्रयत्न केला. तर, मच्छिमार करणाऱ्या बागडी समाजाने चांगलेच धारेवर धरत नदी प्रदुषित करणाऱ्या घटकांवर कारवाई करण्याची मागणी केली. यावेळी अधिकारी हरबड यांनी दुषित पाण्याचे नमुने घेऊन वरीष्ठ अधिकाऱ्यांना अहवाल पाठविण्याचे आश्वासन दिले.

पंचगंगा नदीला मलयुक्त काळेकुट्ट पाणी आले असून नदीकाठी दुर्गंधी पसरली आहे. दुषित पाण्यामुळे पाण्याला फेस येत आहे. पाण्यातील ऑक्सिजनचे प्रमाण कमी झाल्याने मासे मृत्यूमुखी पडत आहेत. दुषित पाण्याची तक्रार स्वाभिमानीचे बंडू पाटील यांनी प्रदुषण नियंत्रण मंडळाकडे केल्याने गुरुवारी दुपारी हरबड तेरवाड बंधारा येथे आले होते. यावेळी पाटील, बालीघाटे यांच्यासह नदीकाठावरील रहिवासी, मच्छीमार करणारे बागडी समाज यांनी तीव्र भावना व्यक्त करत अधिकारी हरबड यांच्यावर प्रश्नांची सरबत्ती करत धारेवर धरले.

air pollution in Mumbai news
मुंबईची हवा पुन्हा प्रदूषित; कुलाबा, कांदिवली येथे ‘वाईट’ हवेची नोंद
Viral Trend Chastity Belts:
Chastity Belt: योनी शुचिता पट्ट्याचा इतिहास आणि त्यामागील…
Two months ago Thane Municipal Corporation requested bmc for 50 million liters of water
ठाण्याला वाढीव पाण्याची प्रतिक्षा, मुंबई महापालिकेकडून वाढीव पाण्याबाबत अद्याप निर्णय नाही
badlapur east gas spread loksatta news
बदलापूर पूर्वेत पसरला रासायनिक वायू; रहिवाशांना डोळे चुरचुरणे, श्वसनाचा त्रास, वायूगळतीचा संशय
Thane , government projects, dust, health,
सरकारी प्रकल्पांमुळेच धुळधाण, नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम होण्याची शक्यता
kdmc steps to cut off water connection and electricity supply to 58 illegal buildings in dombivli
डोंबिवलीतील ५८ बेकायदा इमारतींमधील पाणी, वीजपुरवठा खंडित करण्याच्या हालचाली, उच्च न्यायालयाच्या आदेशावरून कारवाईचे नियोजन
pune water planning delayed due to absence of Guardian Minister
Pune Water planning : पालकमंत्री नसल्याने पाणी नियोजन लांबणीवर
water supply Bandra area, Bandra,
मुख्य जलवाहिनीतून गळती, वांद्रे परिसरातील पाणीपुरवठ्यावर परिणाम

आणखी वाचा-कोल्हापूरात दोन वर्षात २१ मोबाईल टॉवर चोरीस; पोलिसात फिर्याद दाखल

हरबड यांनी इंचलकरंजी शहरातील मलयुक्त सांडपाणी असल्याचे सांगितल्याने महापालिकेच्या अधिकाऱ्यांना तेरवाड बंधारा येथे बोलावून घ्या व त्यांच्यावर कारवाई केल्याशिवाय येथून जावू देणार नाही अशी भूमिका घेत बंधाऱ्यावरच रोखून धरले. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. अधिकारी हरबड यांनी इंचलकरंजी महापालिकेच्या सांडपाणी प्रक्रिया प्रत्यक्षात पाहणी करुन कारवाईबाबात अहवाल तयार करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आली.

Story img Loader