कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात शुक्रवारी मुसळधार पाऊस पडला. पंचगंगा नदी इशारा पातळीच्या दिशेने वाहत आहे. गेल्या २४ तासात पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांच्या संख्येत जवळपास दुप्पट वाढ झाली आहे. सायंकाळी चार वाजता ७२ बंधारे पाण्याखाली गेले होते. जिल्ह्यात आज सर्वच भागात जोरदार पाऊस झाला. पाणलोट क्षेत्रात संततधार कायम आहे. शहरातही पावसाने जोर धरला होता. राधानगरी धरणात साडेपाच टीएमसी पाणीसाठा असून १४०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

पावसामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होऊ लागली आहे. काल चार वाजता ४४ बंधारे पाण्याखाली आले. पहाटे चार वाजता ४९ तर आज सायंकाळी चार वाजता ७२ बंधारे पाण्याखाली गेले होत. जिल्ह्यातील चार धरणांमध्ये पूर्ण साठा झाला आहे. जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३३ मिमी पाऊस झाला आहे. गगनबावडा येथे सर्वाधिक १०० मिमी पाऊस झाला. शिवाय, पन्हाळा- ३० मिमी, शाहुवाडी- ५३ मिमी, राधानगरी- ४५ मिमी, गडहिंग्लज- ३५ मिमी, भुदरगड- ६२मिमी, आजरा- ५३ मिमी, चंदगड- ५४ येथेही मुसळधार पावसाची नोंद झाली आहे.

हेही वाचा – कोल्हापूर : दंगलग्रस्त गजापूर, मुसलमानवाडीत तातडीची मदत वाटप सुरु

हेही वाचा – विशाळगडावर यासीन भटकळ आल्याची चौकशी – हसन मुश्रीफ

दरड कोसळली

आजरा ते चंदगड रस्त्यावर कासारकांडगाव -जेऊर या गावाच्या मध्ये दरड कोसळली. रस्त्याला लागून असलेल्या डोंगरावरून काही दगड घसरून खाली आले आहेत. स्थानिक प्रशासन व वन विभागामार्फत दगड व झाडे बाजूला करून रस्ता खुला केला आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchganga river again towards warning level in kolhapur 72 dams under water ssb