कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर कायम राहिल्याने पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ होत आहे. बारा वाजता पंचगंगा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. प्रशासनाने पंचगंगा वारणा नदीकाठी सतर्कतेचा इशारा दिला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – कोल्हापूर : पाऊस – रविवार समीकरण कायम; राधानगरी धरण काठोकाठ

हेही वाचा – माकडाच्या हल्ल्यात कोल्हापुरात विद्यार्थी जखमी

कोल्हापूर जिल्ह्याच्या पाणलोट क्षेत्रात धुवाधार पाऊस होत आहे. शहर आणि परिसरातही पावसाचे प्रमाण गेले तीन-चार दिवस वाढले होते. आज सकाळपासून पावसाची उघडीप आहे. तथापी, कोल्हापुरातील पंचगंगा नदी पाणीपातळी काल रात्रीपासून इशारा पातळीकडे चालली होती. आज सकाळी ११ वाजता ३९ फूट ही इशारा पातळी गाठली तर दुपारी बारा वाजता ३९ फूट १ इंच इतकी पाणी पातळी झाल्याने नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. आता नदी बेचाळीस फूट ही धोका पातळी गाठते का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान जिल्ह्यातील सर्व नदीकाठी सतर्कता ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तर काही भागांमध्ये पुराचे पाणी येऊ लागल्याने कुटुंबांना स्थलांतरित केले जात आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Panchganga river crossed the warning level in kolhapur ssb