उद्योगांचे रसायनयुक्त पाणी, मलायुक्त सांडपाण्यामुळे गटाराचे स्वरुप
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
इचलकरंजी येथील जीवनदायी असणारी पंचगंगा नदी प्रदूषणाच्या विळख्यात सापडली असून, तिला गटाराचे स्वरूप प्राप्त झाले आहे. कोल्हापूर महापालिकेचे प्रक्रिया न करताच सोडले जाणारे मलायुक्त सांडपाणी, अस्ताव्यस्त टाकलेले निर्माल्य, कारखान्याचे रसायनयुक्त पाणी थेट नदीत मिसळत असल्यामुळे नदीपात्रातील पाणी आत्यंतिक दूषित झाले आहे. नदीच्या पाण्यात घातक रसायनांचे तवंग दिसत आहेत.
पंचगंगा नदीच्या दूषित पाण्याविषयी ओरड सुरू झाली की जिल्हा प्रशासन, प्रदूषण नियंत्रण मंडळ यांना जाग येते. थातूरमातूर उपाय केल्याची सोंगेढोंगे केली जातात. इचलकरंजी प्रशासनाकडूनही नदी प्रदूषणमुक्त व्हावी यासाठी विविध पातळींवर उपक्रम राबवले जातात, पण नागरिकांकडून त्याला काहीच प्रतिसाद मिळत नाही. नागरिकांनी निर्माल्य पंचगंगा नदीत अस्ताव्यस्त सोडल्यामुळे नदीच्या पाण्यातून दरुगध येत आहे.
नववर्ष उजाडले, की पाणीपातळी कमी होऊन नदीत ‘नेमेचि येतो पावसाळा’ या युक्तीप्रमाणे पावसाळा झाल्यानंतर पंचगंगा नदीचे पाणी दूषित होण्यास सुरुवात झालीच म्हणून समजावे. त्यामुळे एकीकडे कावीळ व डेंग्यूसारखे आजार पसरत असून, दुसरीकडे पंचगंगा नदीचे पाणी दूषित होत असल्यामुळे नागरिकांतून नाराजी व्यक्त होत आहे. सुजाण नागरिकांनी ही माहिती नगरपालिका प्रशासनाला दिली असता प्रशासनाने पाहणी करण्याचे साधे कष्टही घेतले नाहीत. समाजसेवेचा आव आणणारे नगरसेवकही याची जबाबदारी घेत नाहीत. परिणामी, ग्रामीण भागातील नागरिकांचे पाण्यावाचून मोठय़ा प्रमाणात हाल होत आहेत. याकडे पालिका प्रशासन कधी लक्ष देणार, असा सवाल नागरिकांतून होत आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी काविळीने ४० जणांचा बळी घेतला जाऊनही पालिका याकडे दुर्लक्ष करत असल्याने आणखी किती जणांचा बळी जाणार? असा सवाल नागरिकांतून होत आहे.
फेब्रुवारीच्या महिन्याच्या पहिल्याच आठवडय़ात नदीपत्रात पाणी नसल्यामुळे इचलकरंजी शहरासह आजूबाजूच्या ४० खेडय़ांतील नागरिकांना पाण्याची समस्या उद्भवत आहे. पंचगंगा नदीपात्रात सध्या इचलकरंजी शहराचे ड्रेनेजचे पाणी कोल्हापूर शहरासह कागल, शिरोली व लक्ष्मी औद्योगिक वसाहत, इचलकरंजी शहरातील सायिझग व प्रोसेसचे रसायनयुक्त पाणी पंचगंगा नदीत मिसळत असल्यामुळे नदीतील मासे मृत पडू लागले आहेत. तसेच नदीच्या पाण्यावर रसायनचा थर साचत आहे. त्यामुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. लवकरच उन्हाळा सुरू होत आहे. त्याच्या अगोदरच नदीची झालेल्या दुरवस्थेची खबरदारी शासकीय यंत्रणेने घेऊन नदी प्रवाहित ठेवण्याची मागणी होऊ लागली आहे.