किल्ले पन्हाळा येथील तापकीर दर्ग्याची प्रकरणी संशयताना अटक करण्यात येईल या मागणीसाठी शनिवारी पन्हाळा बंद पाळण्यात आला. त्याला प्रतिसाद मिळाल्याने या पर्यटनस्थळी शुकशुकाट जाणवत होता.
पन्हाळा येथील तापकीर दर्गा व तुरबतीची दोन दिवसापूर्वी पहाटे नासधूस करण्यात आली होती. त्यानंतर गावातील ऐक्य कायम ठेवण्यासाठी हिंदू मुस्लिम बांधवांनी त्याचे पुन्हा बांधकाम केले. हि मोडतोड करणाऱ्यांना अटक करण्यात यावी अशी मागणी स्थानिक नागरिकांनी केली आहे.
पर्यटन हंगामावर परिणाम याच मागणीसाठी आज बंदचे आयोजन करण्यात आले होते. व्यावसायिक, नागरिकांनी व्यवहार बंद ठेवून त्याला प्रतिसाद दिला. नेहमी वर्दळ असणारा पन्हाळ्यातील बस स्थानक, ताराराणी मार्केट, बाजीप्रभू पुतळा यासह तबक उद्यान, अंबरखाना, सज्जाकोटी, अंधारबाव आदी पर्यटकांचा वावर असलेल्या ऐतिहासिक ठिकाणी शांतता नांदत होती. पर्यटन हंगाम तेजीत असताना आज पन्हाळ्यामध्ये सर्वत्र शुकशुकाट जाणवत होता