श्रमिक प्रतिष्ठानच्या वतीने यंदाही पानसरे व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. १ ते ७ डिसेंबर दरम्यान सायंकाळी ६ वाजता शाहू स्मारक भवन येथे व्याख्यानमाला होणार असून, ‘लोकशाहीला धर्माधतेचे आव्हान’ हा या वर्षीच्या व्याख्यानाचा बीजविषय असणार आहे, ही माहिती प्रतिष्ठानचे अध्यक्ष विलास रणसुभे यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली.
मिलिंद यादव म्हणाले, व्याख्यानमालेचे यंदाचे हे १३वे वर्ष आहे. व्याख्यान व व्याख्याते याप्रमाणे- १ डिसेंबर- सेक्युलर- ज्येष्ठ पत्रकार सुरेश द्वादशीवार, अध्यक्ष भालचंद्र कांगो, २ डिसेंबर- सांस्कृतिक राष्ट्रवाद आणि लोकशाही- राजकीय विश्लेषक किशोर बेडकीहाळ, अध्यक्ष डॉ. जयसिंग पवार, ३ डिसेंबर दहशतवाद आणि धर्माधता- पत्रकार समर खडस-अध्यक्ष दिलीप पवार, ४ डिसेंबर- विवेकवाद- ज्येष्ठ विचारवंत पी. साईनाथ- अध्यक्ष उदय नारकर, ५ डिसेंबर धर्माधता, अल्पसंख्याक, स्त्रिया- कायदेतज्ज्ञ तिस्ता सेटलवाड- अध्यक्ष आशा कुकडे, ६ डिसेंबर- धर्माधता आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्य – प्रा.जयदेव डोळे- अध्यक्ष डॉ. जे. एफ. पाटील, धर्माधतेचे लोकशाहीला आव्हान- डॉ. रावसाहेब कसबे- अध्यक्ष डॉ. अशोक चौसाळकर. पत्रकार परिषदेला मेघा पानसरे, आनंदराव परुळेकर, चिंतामणी मगदूम, एस. बी. पाटील, दिलीप चव्हाण, रमेश वडणगेकर, उमेश पानसरे, रघुनाथ कांबळे आदी उपस्थित होते.
पानसरेंविना पहिली व्याख्यानमाला
ज्येष्ठ कामगार नेते गोिवदराव पानसरे यांनी अवी पानसरे यांची प्रबोधनपर कार्य पुढे सुरू ठेवण्यासाठी त्यांच्या नावाची व्याख्यानमाला सुरू केली. गोिवद पानसरे आपल्या अन्य कामातून वेळ काढून या ठिकाणी नेहमी हजेरी लावत असे. २२ फेब्रुवारी रोजी पानसरे यांचा मृत्यू झाल्याने त्यांच्या अनुपस्थित ही पहिली व्याख्यानमाला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा