कोल्हापूर :  दुचाकीचे मूळ सायलेन्सर बदलून कर्णकर्कश आवाज काढणारे बसविण्यात आलेले बेकायदेशीर सायलेन्सर गडहिंग्लज पोलिसांनी जप्त करत चक्क दसरा चौकात त्यावर रोड रोलर फिरवून ते नष्ट करण्यात आले. शहराला शिस्त लावण्यासाठी पोलिसांनी केलेल्या या अनोख्या कारवाईचे नागरिकांनी स्वागत केल्याचे दिसून आले. 

हेही वाचा >>> लाच प्रकरणी कोल्हापुरात तलाठी, खाजगी व्यक्तीवर कारवाई

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
dream of five and half thousand policemens house in Lohgaon will come true soon
लोहगावात साडेपाच हजार पोलिसांच्या घराचे स्वप्न लवकरच साकार
Gold seized Mumbai airport, Mumbai airport,
मुंबई विमानतळावरून पावणेतीन कोटींचे सोने जप्त, दोन कर्मचाऱ्यांना अटक
maharashtra assembly election 2024 traffic diversions in pune city on occasion of pm modi visit
पंतप्रधानांच्या दौऱ्यानिमित्त शहरात वाहतूक बदल; स. प. महाविद्यालय परिसरातील रस्ते वाहतुकीस बंद
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
sushma andhare
Sushma Andhare: ‘केलंय काम भारी’वरून अंधारेंचा हल्लाबोल, अंबरनाथच्या सभेत आमदार किणीकरांसह शिंदे गटातील गटबाजीवरही बोट

गडहिंग्लज पोलीस ठाण्याकडे गेले तीन महिने झाले परिविक्षाधीन पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी.जे हे रुजू झाल्यानंतर शहरातील अतिक्रमण, अवैध धंद्यावर बेधडकपणे कारवाई करण्यात आली. शहरातील वाहतुकीलाही शिस्त लावण्याचा प्रयत्न केला. याबरोबरच विना कागदपत्रे, विना हेल्मेट दुचाकी चालविणे, लायसन्स नसणे, ट्रिपल सीट, मोठे आवाज करणारे सायलेन्सर बसविणाऱ्या दुचाकी स्वारांवर कारवाईचा धडाका सुरू केला आहे. या माध्यमातून त्यांनी शहराला शिस्त लावण्याचा केलेला प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.     दरम्यान, दुचाकींची सायलेन्सर बदलून मोठ्या आवाजाची बेकायदेशीररित्या बसविण्यात आलेली जवळपास १०१ सायलेन्सर पोलिसांनी जप्त केली होती. सदर सायलेन्सर आज सायंकाळी दसरा चौकात रोड रोलरच्या साह्याने नष्ट करण्यात आली. पोलिसांच्या या अनोख्या कारवाईची शहरात चर्चा झाली. गडहिंग्लज पोलिसांनी अशा पद्धतीने केलेली ही कारवाई बहुतेक पहिलीच असल्याचे बोलले जात आहे. शहराला शिस्त लावण्यासाठी पोलिसांच्या या अनोख्या करावयाचे नागरिकांनी देखील स्वागत केले. यावेळी परिविक्षाधिन सहाय्यक पोलीस अधीक्षक हर्षवर्धन बी जे, पोलीस उपअधीक्षक रामदास इंगवले उपस्थित होते.