कोल्हापूर : कोल्हापुरातील कुख्यात केदार टोळी विरोधात मोक्का (संघटित गुन्हेगारी) अंतर्गत कारवाई करण्यास बुधवारी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी मान्यता दिली आहे. या टोळीचा प्रमुख संतोष सोनबा बोडके यांच्या कारवाया लक्षात घेऊन त्यास ३ मार्च पासून येरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे येथे स्थानबद्ध करण्यात आले आहे . त्यानंतर टोळीचे सूत्रे केदार भागुजी घोडके याने घेतल्यानंतर टोळीचा बदलौकिक वाढत गेला.
हेही वाचा >>> चिथावणीखोर वक्तव्य प्रकरणी हसन मुश्रीफ, के. पी. पाटील यांच्या विरोधात कारवाई करण्याची इचलकरंजीत मागणी
या टोळीने विरोधी टोळीचा प्रमुख प्रकाश बबन बोडके याचा अर्ध शिवाजी पुतळा ठिकाणी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी केदार घोडके, राजू सोनबा घोडके, युवराज राजू शेळके, करण राजू शेळके, चिक्या उर्फ विकास भीऊंगडे, तानाजी धोंडीराम कोळपटे, सत्यजित भागोजी भाले, राजू मधु वडेकर यांच्या विरोधात ३१ मे रोजी गुन्हा दाखल झाला होता. तपासामध्ये या गुन्हेगारी टोळीने आर्थिक लाभ संपादन करण्याच्या उद्देशाने २५ गंभीर गुन्हे केल्याचे निष्पन्न झाले. त्यावरून पोलीस निरीक्षक सतीश गुरव यांनी मोका अंतर्गत दिलेलया प्रस्तावाची छाननी स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक महादेव वाघमोडे यांनी केली. हा प्रस्ताव विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी, पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांच्याकडे सादर झाल्यावर कारवाई करण्यास मान्यता दिली आहे. गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी अजित टिके यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.