कोल्हापूर : ‘गोविंदा आला रे आला’च्या गजरात मंगळवारी कोल्हापुरात दहीहंडीचे उंचच उंच थर रचले गेले. पावसाचा शिडकावा असतानाही दहीहंडी फोडण्याचा उत्साह दिसत होता. विधानसभा निवडणूक तोंडावर असल्याने दहीहंडीवर राजकीय प्रभाव दिसत होता. कोल्हापुरात आज अनेक ठिकाणी दहीहंडीचे आयोजन करण्यात आले आहे. न्यू गुजरी पेठेतील न्यू गुजरी मित्र मंडळाची दहीहंडी ठिकाणी उत्साह दिसून आला. मुंबईतील नृत्य आणि नेत्रदीपक रोषणाई हे आकर्षण होते.

सेनेतील स्पर्धा

राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेनेतर्फे शिवाजी महाराज चौक येथे भगव्या दहीहंडीचे आयोजन केले. तर ठाकरे गटाने १ लाख ५१ हजार रुपयांची निष्ठा दहीहंडी आयोजित केली. गुजरी कॉर्नरला मनसेने दहीहंडीचे आयोजन केले आहे. गोकुळ दूध संघात दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा – पंढरपूर: चंद्रभागा धोक्याच्या पातळीकडे; पूरसदृश स्थिती कायम

हेही वाचा – Shivaji Maharaj Statue : महायुतीत बेबनाव? देवेंद्र फडणवीसांच्या वक्तव्यानंतर अमोल मिटकरींनी पोस्ट केला शिवरायांचा फोटो, म्हणाले..

तीन लाखांची बक्षिसे

रात्री उशिरा तीन लाखांची धनंजय महाडिक युवाशक्ती आणि भाजप यांची दहीहंडी हे कमालीचे आकर्षण होते. इचलकरंजीत बुधवारी यशोलक्ष्मी सांस्कृतिक भवन मैदानात विजेत्या गोविंदा पथकास ३ लाख ११ हजार बक्षीस असलेली जिल्ह्यातील सर्वात मोठी दहीहंडी राहुल आवाडे युवा मंचने आयोजित केली आहे.

Story img Loader