कोल्हापूर: गडहिंग्लज तालुक्यात पोल्ट्रीचालकाने तीन अल्पवयीन मुलांना बेदम मारहाण केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. बाल हक्क कार्यकर्ते अतुल देसाई यांनी याबाबत बुधवारी बाल हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केले असून जिल्हा प्रशासनाकडून सविस्तर माहिती मागवली आहे.हडलगे या गावात एका पोल्ट्री चालकाने त्याच्याकडे काम करणाऱ्या मुलाना बांधून घालून मारहाण केली. मुलांनी कोंबड्यांना पाणी न पाजल्याने त्या मृत्युमुखी पडल्याच्या रागातून मारहाण केल्याचे सांगण्यात येते.

मुलांच्या पालकांनी जाब विचारला असता उडवा उडवी केल्याने त्यांनी नेसरी पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र तेथे पोल्ट्री चालक व मालकांमध्ये तडजोड झाल्याने गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ केली.यावर ही माहिती कळताच अतुल देसाई यांनी बालक आयोगाकडे तक्रार केली आहे.

Story img Loader