कोल्हापूर : काँग्रेसकडून कर्नाटक राज्यातील योजना, विकासकामांचा भूलभुलैया निर्माण केला जात आहे. ‘कर्नाटक पॅटर्न’ ही फसवणूक असल्याने महाराष्ट्रातील जनतेने काँग्रेसच्या या आश्वासनांना बळी पडू नये, असे आवाहन केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री प्रल्हाद जाेशी यांनी येथे केले.यावेळी माजी आमदार संजय पाटील, जिल्हाध्यक्ष विजय जाधव, प्रदेश सचिव महेश जाधव, कार्यकारिणी सदस्य राहुल चिकोडे, कोल्हापूर दक्षिणचे उमेदवार अमल महाडिक उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

काँग्रेसचे अनेक नेते महाराष्ट्रात येऊन ‘कर्नाटक पॅटर्न’ची उदाहरणे देत आहेत. काँग्रेसने सत्तेवर येण्यासाठी ज्या योजना जाहीर केल्या त्या पैसे नसल्याने बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. आमदार निधीचीही टंचाई भासू लागल्याने आमदारांनीच या योजना बंद करण्याची मागणी राहुल गांधी यांच्याकडे केली आहे, असा दाखला देऊन जोशी म्हणाले, काँग्रेसने कर्नाटक विधानसभा निवडणुकीत महिलांना मोफत बस प्रवासाची जाहीर केलेली योजना निधीअभावी बंद पडण्याच्या मार्गावर आहे. आता धावणाऱ्या बसेसची संख्याच कमी करण्यात येत आहे. बस वेळेवर येत नसल्याने आंदोलने सुरू आहेत. दर महिन्याला महिलांना २ हजार रुपये देण्याच्या गृहलक्ष्मी योजनेचे गेल्या तीन महिन्याचे पैसे अजून मिळालेले नाहीत. महिन्याला १० किलो तांदूळही दिला जात नसून त्यातील पाच किलाे केंद्र शासनच देत आहे.