कामगार नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्याप्रकरणात शुक्रवारी कर्नाटक येथील सनातनचा साधक जे. पी. ऊर्फ प्रकाश अण्णा याचे नाव समोर आले आहे. त्याला एनआयएने मडगाव बॉम्बस्फोट प्रकरणी रेड कॉर्नर नोटीस बजावली होती. कोल्हापूर पोलीस त्याचा शोध घेत असल्याचे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. वीरेंद्र तावडेला कर्नाटकातून जे. पी. अण्णाने चॉकलेट (गोळ्या, काडतूस) आणि देशी साहित्य (पिस्तूल) दिल्याचा संशय कोल्हापूर पोलिसांना आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ज्येष्ठ नेते गोविंदराव पानसरे यांच्या हत्याप्रकरणी पोलीस तपासादरम्यान पानसरे यांच्या हत्येचा पाच ते सहा जणांनी कट रचला असून प्रत्यक्ष हल्लेखोर दोघे असल्याचे समोर आले होते. तसेच हल्लेखोर हे उत्तम मराठी भाषक असल्याचेही तपासात उघड झाले होते. हल्लेखोरांनी पानसरेंवरील हल्ल्यापूर्वी मराठीतून पत्ता विचारल्याची माहिती एका साक्षीदाराने आपल्या जबाबात दिली होती.

यानंतर दाभोलकर हत्येचा तपास करणाऱ्या सीबीआयने १० जून रोजी सनातनच्या डॉ. वीरेंद्रसिंह तावडे याला अटक केली. दाभोलकर यांच्या हत्येपूर्वी तावडे कोल्हापुरात येत होता तसेच त्याने कोल्हापुरातील काही जणांची रेकी केल्याचेही समोर आले होते.

पानसरे, दाभोलकर, तसेच कलबुर्गी यांच्या हत्याप्रकरणात सहा जणांची टीम असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली होती. मडगाव बॉम्बस्फोटातील फरार आरोपी सारंग अकोलकर, प्रवीण लिमकर, विनय पवार, रुद्र पाटील यांच्यावर पोलिसांचा दाट संशय होता. यानंतर पानसरे हत्याप्रकरणात पोलिसांनी सनातनचा साधक समीर गायकवाड याला अटक केली. अटकेनंतर समीर व रुद्र हे मित्र असल्याचे समोर आले. तर दाभोलकर हत्या प्रकरणातील डॉ. वीरेंद्र तावडे हा या तीनही हत्यांमागील मास्टर माइंड असल्याचे सीबीआयच्या तपासात समोर आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सहा जणांची नावे उघड झाली असून यापकी समीर गायकवाड याला पानसरे हत्याप्रकरणी तर तावडे याला दाभोलकर हत्याप्रकरणी अटक करण्यात आले आहे. अन्य फरार आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. कर्नाटकातील जे. पी. ऊर्फ प्रकाश अण्णा याने वीरेंद्र तावडेला बंदूक आणि काडतूस त्या पोलीस अधिकाऱ्याच्या मदतीने पुरविल्याची माहिती कोल्हापूर पोलिसांच्या तपासात उघड झाली आहे.