सतत चच्रेत असलेल्या आणि अनेक वष्रे रखडलेल्या श्री महालक्ष्मी मंदिर व परिसर विकास आराखडय़ाला गती देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यासाठी नागरिक व भाविकांना या आराखडय़ाचे सादरीकरण शुक्रवार, २४ जून रोजी केशवराव भोसले नाटय़गृह येथे होणार असल्याची माहिती बुधवारी येथे देण्यात आली. कोल्हापूर महानगरपालिकेने श्री महालक्ष्मी मंदिर व परिसर विकासाचा रक्कम २५५ कोटींचा आराखडा शासनास सादर केला आहे.
श्री महालक्ष्मी मंदिर व परिसर विकास आराखडय़ाचा विषय प्रदीर्घ काळ चच्रेत आहे. अनेकदा आराखडा बदलला गेल्याने संभ्रमाचे वातावरण आहे. त्यामुळे हा विषय टीकेचा बनला आहे. या कामाला पुन्हा गती देण्याच्या हालचाली सुरू आहेत. या आराखडय़ाचे सादरीकरण २३ जून रोजी करण्यात येणार होते. या आशयाची बातमी कोल्हापूर महानगरपालिकेमार्फत यापूर्वी वृत्तपत्रातून प्रसिद्ध करण्यात आली होती. परंतु काही कारणास्तव प्रसिद्धीकरण करण्याची वेळ बदलण्यात आली आली. सदरचे सादरीकरण २४ जून रोजी दु. २ वा. केशवराव भोसले नाटय़गृह येथे करण्यात येणार आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेने श्री महालक्ष्मी मंदिर व परिसर विकासाचा रक्कम रु. २५५ कोटींचा आराखडा शासनास सादर केला आहे. पालकमंत्री व स्थानिक लोक प्रतिनिधींनी केलेल्या सूचनांप्रमाणे प्राधान्याने करावयाच्या कामांचा समावेश पहिल्या टप्प्यामध्ये करण्यात आलेला आहे. पहिल्या टप्प्यामध्ये पुरातन वास्तू संवर्धन, पाìकग सुविधा, पर्यटक सुविधा इ. कामांचा समावेश करण्यात आला आहे.
६ जून रोजी जिल्हास्तरीय तीर्थक्षेत्र, पर्यटन स्थळे व परिसर विकास कामांच्या बठकीमध्ये लोकप्रतिनिधींनी सर्व समावेशक व व्यापक आराखडा तयार करण्याच्या उद्देशाने आराखडय़ाचे जाहीर सादरीकरण जनतेस करावे अशी मागणी केली आहे. यामुळे नागरिक व भाविकांना सदरचा आराखडय़ाची माहिती होऊन, सुविधांच्या आनुषंगिक सूचना करणे शक्य होईल. याबाबत पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आराखडय़ाचे सादरीकरण करण्याची सूचना महानगरपालिकेचे आयुक्त पी. शिवशंकर यांनी केली आहे.