कोल्हापूर: कोल्हापूरच्या हद्दवाढी विरोधात पुन्हा एकदा प्रस्तावित १८ गावांतील ग्रामस्थांनी विरोध चालवला आहे. गुरुवारी सर्व १८ गावातील व्यवहार बंद करुन आंदोलन केले जाणार आहे. हा निर्णय उजळाईवाडी येथे झालेल्या एका बैठकीत घेण्यात आला आहे.
कोल्हापूर महानगरपालिकेच्या हद्दवाढीला विरोधी सर्वपक्षीय कृती समितीने सुरुवातीपासून विरोध केला आहे. यापूर्वीही गावे बंद आंदोलन करण्यात आले होते. पुन्हा हद्दवाढीसाठी प्रयत्न जात असल्याचे समजताच या विरोधी समितीने पुन्हा बंदचे हत्यार उपसले आहे. विरोधाचा सनदशीर मार्गाने लढा देण्याचे नेत्यांनी बैठकीत सांगितले. विरोधी कृती समितीचे प्रवक्ते नाथाजीराव पोवार यांच्यासह सर्व नेत्यांनी हद्दवाढीला विरोध करण्यासाठी संघर्ष करण्याचे आवाहन केले.