कोल्हापूर : प्रवाशांच्या अडचणींकडे लक्ष वेधण्यासाठी बुधवारी रूकडी बंदला प्रतिसाद मिळाला. तर रेल्वे प्रवाशांनी रुळावर चालून आत्मक्लेश आंदोलन केले. आंदोलकांना पोलीसांनी ताब्यात घेतल्याने रेल्वे प्रवासी व ग्रामस्थांकडून संताप व्यक्त केला.. या घटना क्रमामुळे खासदार धैर्यशील माने यांच्या गावातील हे आंदोलन वादग्रस्त ठरले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

करोना काळात रेल्वे पॅसेंजर तसेच एक्सप्रेस गाड्यांचे तिकीट दर दुप्पट केले. अलिकडे रुकडी, येथील एक्सप्रेस गाडया चा थांबा बंद केल्याने कोल्हापूर कडे शिक्षण, नोकरी तसेच कामधंदयासाठी जाणाऱ्या विद्यार्थी, प्रवासी नागरीकांची आर्थिक, मानसिक कुचंबणा झाली. रेल्वे भूयारी मार्गाचे गलथान काम व गैरसोयीमुळे नागरीकांवर मनस्तापाची वेळ आली. या विविध मागण्यांसाठी सामाजिक कार्यकर्ते अॅड. अमितकुमार भोसले यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूर रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करूनही प्रतिसाद मिळाला नव्हता. त्यावर आत्मक्लेश पदयात्रा काढण्याचे निवेदन दिले होते.

हेही वाचा >>>लोकसभेला राजू शेट्टी यांना जय शिवराय शेतकरी संघटनेचे शिवाजी माने यांच्याकडून आव्हान ; दोन शेतकरी नेत्यात सामना रंगणार

आंदोलकांची धरपकड,आंदोलन मोडून काढले

या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी रूकडी ग्रामस्थांनी बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पंचक्रोशीतील रेल्वे प्रवासी, विद्यार्थी, नोकरदार व ग्रामस्थांनी रेल्वे स्थानकात आंदोलन आरंभले. तेथे आधीपासूनच मोठ्या संख्येने असलेल्या पोलिसांनी जमू लागलेल्या आंदोलकांना हाकलून काढले. यामुळे प्रवासी, नागरीक घाबरले. कांहीने खासगी वाहने व बसने जाणे पसंत केले. पोलीसांनी आंदोलकांना रेल्वे भूयारी मार्गाजवळ ताब्यात घेताना वादावादी झाली.आंदोलनकर्ते अमित भोसले , कुमार चव्हाण , प्रशांत गवळी आदींना ताब्यात घेतले.