कोल्हापूर : जालना येथे मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांवर पोलिसांनी केलेल्या लाठीमाराचे तीव्र पडसाद कोल्हापूर शहर आणि जिल्ह्यात उमटले. या हल्ल्याचा आदेश देणाऱ्या पोलीस अधीक्षकांचा निषेधा च्या घोषणा दिल्या. तर महिला कार्यकर्त्यांनी मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला.सकल मराठा समाजाचे कार्यकर्ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात जमले. मराठा समाजावर लाठी मार करण्याचा आदेश देणाऱ्या गृहमंत्र्यांचा अधिकार असो,अत्याचाराची जबाबदारी स्वीकारून तिघाडी सरकार बरखास्त करा,ल्ला करण्याचा आदेश कुणी दिला त्या अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशा घोषणा देत संताप व्यक्त करण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

ग्रामीण भागात निदर्शने

मराठा आरक्षणासाठी लोकशाही पद्धतीने आंदोलन सुरू असताना त्यांच्यावर लाठीमार करणे निषेधार्य असल्याचे सकल मराठा समाजाचे राज्य उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी सांगितले.इचलकरंजी, हातकणंगले, शिरोळ, करवीर,चंदगड, शाहूवाडी, गडिंग्लज तालुक्या ही या प्रकरणी मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांनी निदर्शने केली.

हेही वाचा >>>कोल्हापुरात इन्स्टाग्रामवर पोस्ट करीत भिन्नधर्मीय अल्पवयीन प्रेमीयुगुलाने केली आत्महत्या

राजकीय पडसाद

दरम्यान, या हल्ल्याचा निषेध करून स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक राजू शेट्टी यांनीचळवळ दडपून संपत नाही तर सामोपचार, चर्चेतून मार्ग काढलं पाहिजे. सरकारने चळवळ दडपण्याचा प्रयत्न केला तर ते महागात पडेल,असा इशारा दिला. माकपचे सचिव डॉ. उदय नारकर यांनी आंदोलन चिरडून टाकण्याच्या संदेशातून राज्य सरकारचा संकुचित दृष्टिकोन दिसतो, अशी टीका केली आहे. जिल्हा भाकपचे सचिव सतीशचंद्र कांबळे यांनी मराठा आरक्षण मागणाऱ्या आंदोलकावर दडपशाही करून सरकारने खरे रूप दाखवल्याने त्याचा निषेध करीत असल्याचे म्हटले आहे.