कोल्हापूर: कोल्हापूर म्हटले की मटण तांबडा पांढरा रस्सा डोळ्यासमोर हमखासपणे येतोच गेले काही दिवस दिवाळीचे दिवाळी फराळाचे गोड गोड खाण्याची चंगळ सुरू होती. पण आज भाऊबीज च्या निमित्ताने कोल्हापूरकरांना मटण खाण्याचे वेध लागले आहेत. यामुळे सकाळपासूनच कोल्हापुरातील मटण मार्केटमध्ये मटण खरेदीसाठी रांगा लागल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
कोल्हापूर म्हंटलं की डोळ्यासमोर येतो तो तांबडा पांढरा रस्सा. झणझणीत आणि चविष्ट जेवणासाठी देखील कोल्हापूर देशभरात प्रसिद्ध आहे. मांसाहारी खवय्यांसाठी कोल्हापूर म्हणजे खायची चंगळ. कोल्हापूरला जाणारा प्रत्येकजण तांबड्या पांढऱ्या रश्श्यावर ताव मारण्यासोबतच इतर मांसाहारी पदार्थांची मज्जा लूटत असतो.
दिवाळी फराळ गोडधोड पदार्थावर ताव मारल्यानंतर आता कोल्हापूरकरांना भाऊबीज निमित्त मटणाची लज्जत चाखायची आहे. यामुळे आज सकाळपासून मटन मार्केट समोर खरेदीसाठी रांगा लागल्या आहेत. कोल्हापूर प्रमाणे ग्रामीण भागातील मटण खरेदीसाठी असेच चित्र दिसत आहे.