शहरासह जिल्हयामध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांची स्थिती समाधानकारक दिसून येते. कोल्हापूर जिल्ह्याचे वरदायिनी राधानगरी धरण ९९ टक्के भरले. जिल्ह्यात सर्व तालुक्यात गेल्या २४ तासात ५१.२७ मि. मी. पावसाची नोंद झाली.
या आठवडयात जिल्ह्यात मोठया प्रमाणात पाऊस झाला होता. शनिवारी उघडीप घेतली तरी रविवारी सकाळीपासून आकाशात काळया ढगांची गर्दी होऊन मुसळधार पाऊस झाला. दिवसभर थंड वारे वाहत होते. यामुळे सुट्टीचा दिवस लोकांना घरीच घालवावा लागला. जिल्ह्यात आजअखेर एकूण ९९८२.८६ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. 1 जूनपासून सरासरी ८३१.९० मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यातील तालुकानिहाय पावसाची आकडेवारी मि. मी. मध्ये पुढीलप्रमाणे आहे. तालुक्याच्या नावापुढे गेल्या चोवीस तासात झालेला पाऊस तर कंसात १ जून २०१५ पासून झालेल्या एकूण पावसाची आकडेवारी दिली आहे.हातकणंगले ३.१२ (२३०.७४), शिरोळ २.१४ (२४८.३४), पन्हाळा ०७.०० (७३३.८५), शाहुवाडी २.५०(१०६९.९०), राधानगरी १.८३ (८९२.८७), गगनबावडा ७.०० (२६४०.२०), करवीर ५.४४ (४१०.३२), कागल १५.७० (४७२.५५), गडिहग्लज ४.७१ (४०४.६७), भुदरगड निरंक (९३५.४०), आजरा १.५० (८२७.१०), चंदगड ०.३३ (१११६.९२).
जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांची स्थिती समाधानकारक दिसून येते. धरणांच्या पाणीसाठय़ाची माहिती पुढीलप्रमाणे आहे. राधानगरी २३४.२४ (५९०.९८), तुळशी ७८.३१ (६१६.९१), वारणा ८९४.३५ (६२६.९०), दूधगंगा ५४३.७६(६४६), कासारी ७८.०४ (६२३), कडवी पूर्ण भरले ७०.९१ (६०१.२५), कुंभी ७५.९७ (६१२.२०), पाटगाव ९८.२० (६२६.६०), चिकोत्रा २०.६६ (६८८), चित्री ४४.८० (७१८.९०), जंगमहट्टी २९.६८ (७२६.२०), घटप्रभा पूर्ण भरले ४३.६५ (७४२.३५), जांबरे १६.९९ (७३७) कोदे ल. पा. पूर्ण भरले ६.०६ (१२२).
कोल्हापुरात मुसळधार पाऊस
शहरासह जिल्हयामध्ये रविवारी मुसळधार पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील धरण क्षेत्रात झालेल्या पावसामुळे धरणांची स्थिती समाधानकारक दिसून येते.
Written by बबन मिंडे

First published on: 05-10-2015 at 02:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rain in kolhapur