कोल्हापूर : येथील छत्रपती राजाराम सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत पहिल्या विजयाची नोंद सत्तारूढ गटाने केली आहे. सत्तारूढ गटाचे नेते माजी आमदार महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून विजय मिळवला आहे. त्यांनी विरोधी गटाचे नेते सतेज पाटील यांच्या समर्थकाचा ३९ मताच्या मोठ्या फरकाने पराभव केला आहे. उत्पादक गटातील मतमोजणीमध्ये महाडिक गटाचे उमेदवार उमेदवारांनी मोठे मताधिक्य घेतले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राजाराम कारखान्याची निवडणूक महादेवराव महाडिक यांनी संस्था गटातून लढवली होती. मतदानादिवशी त्यांनी ९० संस्था प्रतिनिधींचा पाठिंबा असल्याचा दावा केला होता. तर सतेज पाटील यांनी आपल्यासोबत ७५ संस्था प्रतिनिधी असल्याचे सांगितले होते. त्यांचे समर्थक मतदार हे मतदान केंद्रात फेटा बांधून मतदानासाठी आले होते. दोघांनी केलेल्या दाव्यापेक्षा प्रत्यक्षात कमी मते मिळाली आहेत. मात्र यामध्ये महाडिक यांनी बाजी मारली आहे.

हेही वाचा – बाजार समितीच्या निवडणुकीत शिंदे गटाबरोबर जाण्यावरून कोल्हापुरातील ठाकरे गटातील मतभेद उफाळले

मतदान याप्रमाणे –

महादेवराव महाडिक – ८३

विरोधी उमेदवार सचिन पाटील – ४४

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Rajaram karkhana first victory for the ruling party mahadevarao mahadik won from sanstha group ssb
Show comments