राज्यातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने २२ फेब्रुवारी रोजी राज्यभर चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशी घोषणा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे संस्थापक माजी खासदार राजू शेट्टी यांनी सोमवारी केली. शेतकऱ्यांच्या प्रश्नांकडे शिंदे – फडणवीस सरकारचे लक्ष नाही. दिवसा वीज, शेतीपंपाचे वाढीव प्रस्तावित वीज दर, ऊस तोडणी मुकादमाकडून होणारी लूट, कापूस, थकीत उसाची एफआरपी, मका, पीक विमा, अतिवृष्टीची भरपाई, तसेच प्रोत्साहनपर अनुदानाची थकीत रक्कम आदी प्रश्नासाठी आंदोलन केले जाणार आहे, असे शेट्टी म्हणाले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

हेही वाचा >>> कोल्हापूर जिल्ह्यात भाजपच्या लोकसभा निवडणुक तयारीचा फायदा होईल – चंद्रकांत पाटील

थकीत वीज बिलापोटी शेतकर्यांच्या शेतीपंपाची वीज तोडणी करण्याचे सत्र राज्य सरकारने चालविले आहे. हे आम्ही कदापि खपवून घेणार नाही. शेतकऱ्यांच्या न्याय प्रश्नांसाठी रस्त्यावरची लढाई करण्यासाठी आम्ही तयार आहोत. बुलढाणा मध्ये रविकांत तुपकर यांच्यासह शेतकऱ्यांच्यावर लाठीमार करणारे कुणाच्या इशार्याने काम करीत आहेत. तातडीने संबंधित पोलीस अधिकार्यांची चौकशी करण्यात यावी. अन्यथा राज्यभरच याचा उद्रेक होईल. राज्य सरकार विरुद्ध आमची आरपारची लढाई असणार आहे, असा इशारा त्यांनी दिला.