हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर ४५९ मते ईव्हीएम मधून जादा निघाली आहेत. त्याबाबत राजू शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे गुरुवारी तक्रार दाखल केली आहे. या पत्रात त्यांनी ईव्हीएम द्वारे झालेले मतदान १२ लाख ४५ हजार ७९७ इतके असून ईव्हीएम मधून मोजलेली मते हि १२ लाख ४६ हजार २५६ इतकी आहेत, असे म्हटले आहे. हा फरक कशामुळे झाला आहे याचे स्पष्टीकरण करण्याची मागणी त्यांनी निवडणूक आयोगाकडे केली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हातकणंगले मतदार संघात राजू शेट्टी यांनी शिवसेनेचे धैर्यशील माने यांनी पराभूत केले. हातकणंगले मतदार संघ निकालाला आठवडा होत आला असताना त्यावर शेट्टी यांनी  प्रश्नचिन्ह लावले आहे. हातकणंगले मतदारसंघात मतमोजणीनंतर ४५९ मते ईव्हीएम मधून जादा निघाली आहेत. त्याबाबत शेट्टी यांनी निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे.

हातकणंगले मतदारसंघात एकूण १२ लाख ५२ हजार २११ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. यामध्ये शेट्टी यांना ४ लाख ८७ हजार २७६ मते मिळाली तर विजयी माने यांना ५ लाख ८२ हजार ७७६ मते मिळाली. वंचित बहुजन आघाडीच्या अस्लम सय्यद यांना १ लाख २३ हजार १५१ मते  मिळाली होती. ईव्हीएम द्वारे १२ लाख ४५  हजार ७९७  मतदान झाले. तथापि,  ईव्हीएम मधून मोजल्या गेलेल्या मतांची संख्या १२ लाख ४६ हजार २५६ इतकी आहे. यामध्ये एकूण  ४५९ मते जादा झाली आहेत. यामध्ये पोस्टलची मते धरलेली नाहीत, असे शेट्टी यांचे म्हणणे आहे. निवडणूक आयोग यावर काय कारवाई करणार हे पाहणे लक्षवेधी ठरले आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Raju shetty complains to ec