स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते आणि हातकणंगलेमधील महाआघाडीचे उमेदवार राजू शेट्टी यांनी आज (दि.२८) कोल्हापुरात अंबाबाईचे दर्शन घेऊन आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी शेकडो कार्यकर्त्यांसह त्यांनी शक्तीप्रदर्शन केले.
यंदा काँग्रेस-राष्ट्रवादीचा हात पकडलेले राजू शेट्टी अर्ज दाखल करताना बैलगाडीतून कार्यालयापर्यंत पोहोचले. यावेळी त्यांच्यासोबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील देखील उपस्थित होते. त्याचबरोबर त्यांच्या या रॅलीत महाआघाडीतील मित्र पक्षांचे शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.