कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी शनिवारी पुन्हा एकदा उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नेते उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. यावेळी झालेली चर्चा सकारात्मक झाल्याचा दावा स्वाभिमानी कडून केला जात आहे.

हातकणंगले लोकसभा मतदारसंघात राजू शेट्टी यांनी महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवावी असे अशी साद घालण्यात आली आहे. त्यास राजू शेट्टी यांचा नकार आहे. शेट्टी हे स्वतंत्रपणे लढणार आहेत महाविकास आघाडीने त्यांना पाठिंबा द्यावा, अशी त्यांची भूमिका आहे. यामुळे संभ्रम निर्माण झाला आहे.

Chandrashekhar Bawankule
Chandrashekhar Bawankule : “उद्धव ठाकरेंमध्ये हिंमत असेल तर…”, चंद्रशेखर बावनकुळे यांचं खुलं आव्हान
kalyan yogidham society viral video
कल्याण मारहाण प्रकरण: “तो म्हणाला मुख्यमंत्री कार्यालयातून एक…
Sanjay Raut
“…तर मोदींनी बांगलादेशमधील हिंदूंसाठी काहीतरी केलं असतं”, ठाकरेंच्या शिवसेनेची टीका
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray : “दाढी कुरवाळण्याच्या नादात जे काही पाप केले…” हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून मनसेची उद्धव ठाकरेंवर टीका
Uddhav Thackeray On Raj Thackeray :
Uddhav Thackeray : “पक्षाला एक हेतू लागतो, पण हे त्या पक्षात…”, उद्धव ठाकरेंची राज ठाकरेंवर अप्रत्यक्ष टीका
Ramdas Athawale On Raj Thackeray
Ramdas Athawale : “मी असताना राज ठाकरेंची महायुतीत गरज काय?”, रामदास आठवलेंचं मोठं विधान
What Uddhav Thackeray Said?
Uddhav Thackeray : उद्धव ठाकरेंचं वक्तव्य, “जनतेच्या मनातला मुख्यमंत्री मी होतो तरीही…”
Actor and TVK President Vijay on Dr BR Ambedkar
Actor Vijay on Ambedkar: “आंबेडकरांचीही मान आज शरमेने खाली झुकली असती…”, तमिळ अभिनेता विजयचं मोठं विधान

हेही वाचा…मुख्यमंत्री शिंदे यांना उद्देशून परखड भाष्य करणारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांचा व्हिडिओ भलताच चर्चेत

या पार्श्वभूमीवर आज राजू शेट्टी , सावकार मादनाईक यांनी मातोश्रीवर उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. या चर्चेवेळी खासदार संजय राऊत, आमदार भास्कर जाधव उपस्थित होते. यावेळी शेट्टी यांना पुन्हा एकदा महाविकास आघाडी कडून निवडणूक लढवावी अशी साद घालण्यात आली . त्यास शेट्टी यांनी नकार देत त्याची कारण मिमांसा स्पष्ट केली. तसेच बाहेरून पाठिंबा द्यावा अशी अपेक्षाही व्यक्त केली.

महाविकास आघाडी अंतर्गत जागावाटप अद्याप निश्चित झालेले नाही. ते झाल्यानंतर याबाबतचा निर्णय होईल असे मातोश्री करून सांगण्यात आले.

हेही वाचा…अंबाबाई मंदिरातील मनिकर्निका कुंड, गरुड मंडप व नगारखाना इमारतीच्या दुरुस्तीसाठी २१ कोटी ६८ लाख रुपये खर्चाला राज्य शासनाची मान्यता

कोल्हापुरात शिवसेनेचाच दावा

दरम्यान, शिवसेनेचे खासदार विनायक राऊत आज कोल्हापुरात एका बैठकीसाठी आले होते. यावेळी पत्रकारांशी बोलताना त्यांनी कोल्हापूर व हातकणंगले हे लोकसभा मतदारसंघ शिवसेनेकडे राहतील, असा दावा केला. शिवसेना हा भाडोत्री उमेदवारांचा पक्ष नाही असेही त्यांनी विधान केले. महाविकास आघाडीतील जागा वाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला

Story img Loader