कोल्हापूर: चालू गळीत हंगामासाठी उसासाठी प्रतिटन एकरकमी ३५०० रुपये पहिली उचल देण्यात यावी. तोपर्यंत साखर कारखाने सुरू करू दिले जाणार नाहीत, असा इशारा शेतकरी नेते राजू शेट्टी यांनी मंगळवारी दिला. गतवर्षी तुटलेल्या उसाची एफआरपी पूर्णपणे देऊन प्रतिटन ४०० रूपये अधिक तातडीने देण्यात यावेत, अशी मागणीही त्यांनी केली.जयसिंगपूर येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेची २२ वी ऊस परिषद आयोजित केली होती. त्यामध्ये मार्गदर्शन करताना शेट्टी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

दुष्काळ निकष बदला

राज्यशासनाने ४० तालुक्यात दुष्काळ जाहीर केला आहे. त्याची तीव्रता अधिक आहे. त्यामुळे निकषात बदल करून सर्कल निहाय दुष्काळ जाहीर करून खरीप पीक वाया गेले असल्याने नुकसान भरपाई द्यावी. ऊस उत्पादक शेतकऱ्यांना दोन टप्यात एफआरपी देण्याची केलेली कायद्यातील बेकायदेशीर दुरूस्ती मुख्यमंत्र्यांच्या  बैठकीत निर्णय झालेला आहे. शासनाने याचा शासन तातडीने करण्यात यावा, अशी मागणी शेट्टी यांनी केली.

हेही वाचा >>>कोल्हापूर :राजू शेट्टींची दिवाळी रस्त्यावर; नवे आंदोलन सुरू

साखर कारखानदारांची बाजू

परिषदेत शेट्टी यांनी साखर उद्योगाच्या हिताच्या काही निर्णयाला संमती दर्शवली. केंद्र सरकारने साखरेचा किमान विक्री दर ३९ रूपये करण्यात करावे. इथेनॉलचे दर सी हेव्ही मोलॅसिस ६० रूपये, बी व्ही ७१ रूपये व सिरपपासून ७५ रूपये करण्यात यावे. साखरेच्या निर्यात सरकारने दिलेल्या मुदतीत करणाऱ्या कारखान्यांना परवानगी यावी. मागील हंगामातील उत्पादीत साखरेवर निर्यातबंदी लावल्यामुळे आंतरराष्ट्रीय बाजारातील साखरेचे भाव व देशातंर्गत बाजारातील भाव यातील फरकाची रक्कम तातडीने ऊस उत्पादक शेतकन्यांच्या खात्यावर वर्ग करावी. नाबार्डने साखर कारखान्यांना साखर तारण कर्ज ४ टक्के व्याज दराने थेट देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.