कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीमध्ये दुसऱ्यांदा अपयश आले असले तरी त्यापासून खचून न जाता पुन्हा उभारी घेण्याच्या हालचाली स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांनी चालवले आहेत यातूनच त्यांनी आता राजर्षी शाहू महाराज जयंती दिली कागल ते कोल्हापूर कैफियत पदयात्रा आंदोलन करण्याची भूमिका शुक्रवारी पत्रकार परिषदेत मांडली.ऊस उत्पादक शेतकरी आणि शक्तीपीठ महामार्ग बाधित शेतकऱ्यांच्या हितासाठी २६ जून या राजर्षी छत्रपती शाहु महाराज जयंतीदिनी शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कागल ते कोल्हापूर अशी कैफियत पदयात्रा काढणार येणार असल्याची घोषणा शेट्टी यांनी  केली.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने गेल्यावर्षी ऑक्टोंबर –नोव्हेंबरमध्ये ऊस उत्पादकांचया प्रश्नावर महामार्ग रोको आंदोलन केले होते, शेतकऱ्यांना एफआरपी देऊनही फायदा झाला होता, त्यामुळे  तीन हजार रुपयांपेक्षा जासत पैसे दिलेल्या शेतकऱ्यांना शंभर रुपये प्रति टन मिळावेत तसेच तीन हजारापेक्षा कमी पैसे दिलेल्या शेतकऱ्त्यंरना पन्नास रुपये द्यावेत, ही मागणी होती. त्यानुसार जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी तशी हमी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. दिलेले आश्वासन पाळणे ही सरकार जबाबदारी होती. मात्र, मुख्यमंत्र्यांनी तसे केले नाही,उलट निदर्शने करणाऱ्या संघटनेच्या कार्यकर्त्यांना अमानुष मारहाण केली, तरी सुद्धा आमचे कार्यकर्ते मागे म्हटले नाहीत पण सरकारने आपली जबाबदारी पार पाडली नसल्याचा आरोप देखील श्री. शेट्टी यांनी केला. मागील हंगामातील प्रतिटन शंभर रुपये घेतल्याशिवाय त्यांच्या बापाला देखील सोडणार नाही, हे साखर कारखानदारांनी लक्षात घ्यावे. मी कोणतीही अपेक्षा ठेवता चळवळ करत आलो आहे. यावेळी कदाचित शेतकऱ्यांना माझी भूमिका पटली नसेल, पण आम्ही लढत राहणार आहोत. मी हार मानणार नसल्याचे राजू शेट्टी यांनी सांगितले.

Ministers from various states campaigned in Mira Bhayandar on Sunday
मिरा-भाईंदर शहरात रविवारी विविध राज्यातील मंत्री प्रचारात
21 November 2024 Rashi Bhavishya
२१ नोव्हेंबर पंचांग: वर्षातील शेवटचा गुरुपुष्यामृत योग कोणत्या…
Priyanka Gandhi statement regarding those who show BJP flags during road shows
रोड-शो दरम्यान भाजपचे झेंडे दाखवणाऱ्यांना प्रियंका गांधी म्हणाल्या, तुम्हाला शुभेच्छा मात्र…
Bajaj auto cng bike
भविष्यात बजाजची बायोगॅसवर चालणारी दुचाकी! राजीव बजाज यांची मोठी घोषणा
readers feedback on loksatta editorial
लोकमानस : कणा आणखी किती भार सोसणार?
Kartik Ekadashi celebration celebrated in traditional spirit at Sri Kshetra Pandharpur Branch with Shri Gajanan Maharaj Sansthan
‘कार्तिकी’निमित्त शेगावात भाविकांची मांदियाळी; पालखी परिक्रमा लक्षवेधी
sunetra pawar dhairyasheel mane on central textile committee
केंद्रीय वस्त्रोद्योग समितीवर धैर्यशील माने, सुनेत्रा पवार
udayanraje bhosale attack rahul gandhi while talking to media
सातारा: राहुल गांधी यांच्याकडून शिवाजी महाराजांची बदनामी; उदयनराजे यांचा हल्लाबोल

हेही वाचा >>>इचलकरंजी दूधगंगा पाणी प्रश्न: जोरदार निदर्शने; आमदार आवाडे यांच्यावर टीकास्त्र

तसेच शक्तीपीठ महामार्गावरून मंत्र्यांकडून दिशाभूल होत असल्याचा आरोप करुन माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले की, शक्तीपीठाच्या नावाखाली शेतकऱ्यांच्या २७ हजार हेक्टर जमीन लुबाडण्याचा सरकारचा डाव आहे, सरकारचे काही मंत्री शक्तीपीठ महामार्गाचे भूसंपादन स्थगित केले असल्याचे सांगत आहेत, मात्र तसा कोणताही आदेश प्रशासनाकडे आलेला नाही, शक्तीपीठ महामार्ग स्थगित नको रद्दच करावा, ही आमची भूमीका असल्याचेही ते म्हणाले.

 ते म्हणाले की, राजर्षी शाहू महाराज यांची शतकोत्तर जयंती सरकार साजरी करत आहे,हे चांगलेच आहे, पण ज्या राजाने प्रजेच्या हितासाठी नेहमीच सकारात्मक विचार करुन शेतकरी हिताचे निर्णय घेतले, राजर्षी शाहुंनी शेतकऱ्यांसाठी मोठं काम केले आहे, अशा राजाच्या शतकोत्तर जयंतीवर्षी सरकार दिलेला शब्द पाळत नाही. हे कितपत योग्य आहे, हे सरकार शेतकऱ्यांला दिलेला शब्द विसरत आहे. म्हणूनच स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने २६ जून या राजर्षी छत्रपती शाहु महाराजांच्या जयंतीदिनी शेतकऱ्यांची कैफियत मांडण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने कागल येथून सकाळी  कैफियत पदयात्रा कोल्हापूरच्या दिशेने निघेल, या कैफियत पदयात्रेत किमान दिडशे कार्यकर्ते सहभागी होणार असल्याचेही ते म्हणाले.

माजी खासदार राजू शेट्टी म्ळणाले की, काँग्रेस सरकार असताना साखरेचा किती हमीभाव वाढला आणि भाजप सरकारच्या काळामध्ये किती हमीभाव पडला याची तुलना करा. काँग्रेसच्या कार्यकाळात रासायनिक खतांची किंमत काय होती आणि आता काय आहे त्याची सुद्धा तुलना करा. उत्पादन खर्च कमी व्हावा यासाठी रासायनिक खतांवर अनुदान होतं. मात्र, सगळी अनुदान कमी केली गेली आहेत. साखरेचा हमीभाव वाढत नाही असे कारखानदार म्हणतात. त्यामुळे मी त्यांना सांगतो की आमच्या सोबत रस्त्यावर या, कसा वाढवून देत नाही ते बघतो. ईडी आणि सीडीला कशाला घाबरता? अशी विचारणा शेट्टी यांनी केली.

आगामी विधानसभेबाबत बारामती येथे होणाऱ्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत चर्चा होणार असल्याचेही शेट्टी यांनी सांगितले, यावेळी डॉ. जालिंदर पाटील यांचयासह अनेक नेते कार्यकर्ते उपस्तित होते.