पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीच्या सरकारला दोन वष्रे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने केंद्र सरकारच्या योजना सर्वसामान्य लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी केंद्रीय अन्न व नागरी पुरवठा मंत्री आणि लोकजन शक्ती पार्टीचे संस्थापक रामविलास पासवान ३ व ४ जून रोजी कोल्हापूर दौऱ्यावर येत आहेत. ४ जून रोजी भाजप व मित्र पक्षांचा मेळावा केशवराव भोसले नाट्यगृहात होणार आहे.
पंतप्रधान मोदी यांनी जन धन, पेन्शन, मुद्रा, पंतप्रधान आवास, वन रँक वन पेन्शन, स्वच्छ भारत, बेटी बचाओ बेटी पढाओ, उज्वला, मेक इन इंडिया अशा योजना सुरु केल्या आहेत. त्या जनतेपयर्ंत पोहोचाव्यात यासाठी याबाबत केंद्रीय मंत्र्यांचा थेट जनतेशी व मुक्त संवाद होण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रात २६ केंद्रीय मंत्री जन संपर्क साधणार आहेत. ४ जून रोजी सकाळी केशवराव भोसले नाट्यगृहात भाजप व मित्र पक्षांचा मेळावा होणार आहे.ग्रामीण भागासाठी गिरिराज सिंह व भूपेंद्र यादव येणार आहेत. त्यांचा इचलकरंजी येथे मेळावा होणार असून त्याची तारीख अद्याप निश्चित नाही, असे भाजपचे जिल्हाध्यक्ष संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. लोक जनशक्ती पार्टीचे प्रमोद कुदळे यांनी सांगितले, की जिल्’ाातील पदाधिकारी व प्रमुख कार्यकर्त्यांचा मेळावा ३ जून रोजी शासकीय विश्रामधाम येथे होणार आहे. या वेळी मकरंद देशपांडे, निरंजन घाटे, विजय जाधव, रवि अनासपुरे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

Story img Loader