लोकसत्ता विशेष प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापूर : पुण्यातील हडपसर ससाणेनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यावर समाजकंटकाने दगड भिरकावला होता. या घटनेच्या निषेधार्थ शेकडो शिवप्रेमींनी शुक्रवारी कोल्हापूर शहराचे प्रवेशद्वार असणाऱ्या तावडे हॉटेल परिसरात ‘रास्ता रोको’ आंदोलन केले.

यावेळी महापुरुषांची विटंबना करणार्‍या समाजकंटकावर कठोर कारवाई करावी,अशी मागणी आंदोलकांनी केली. यावेळी पाकिस्तान मुर्दाबाद, जय श्री श्रीराम , भारत माता की जय, अशा जोरदार घोषणा देण्यात आल्या.

आणखी वाचा-महालक्ष्मीची मूर्ती बदलण्याची कोल्हापूर जिल्हा रेणुका भक्त संघटनेची मागणी

या कृत्यामागे आणखी कोण आहेत याचे सखोल अन्वेषण करावे, अशा मागणीचे निवेदन यावेळी देण्यात आलं. या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर याठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात होता.