आदिशक्तीचा जागर असलेल्या नवरात्रोत्सवाला अवघ्या दोन दिवसांनी सुरुवात होणार असताना करवीरनगरीतील तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. रविवारी करवीरनिवासिनी महालक्ष्मी देवीच्या पुरातनकालीन रत्नजडित अलंकारांची स्वच्छता करण्यात आली.
उत्सवानिमित्त अंबाबाईच्या पूजेतील चांदीचे साहित्य व पालखीची स्वच्छता करण्यात आली. सिस्का कंपनीच्या वतीने मंदिरातील बाह्य परिसराला एलईडी लाईटने उजळण्यात आले आहे. जवळपास १६ लाख किमतीचे हे एलईडी लाईट्स असून, ते पूर्वीच्या हायमास्ट दिव्यांच्या जागी लावण्यात आले आहे. गोिवद चंदानी, परिक्षित रॉय, शांतिकुमार यड्रावे, रोहित शहा, योगेश कुलकर्णी यांच्या वतीने व देवस्थान समिती आणि श्रीपूजक गजानन मुनिश्वर यांच्या पुढाकाराने हा उपक्रम यशस्वी करण्यात आला. देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांचे उन्हापासून रक्षण व्हावे यासाठी दरवर्षीप्रमाणे यंदाही देवस्थान समितीच्या वतीने पूर्व दरवाजा येथील मुख्य दर्शनरांगेवर मांडव उभारण्यात आला आहे. उत्सवात नऊ दिवस देवस्थानतर्फे दिवसभर विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते. त्यासाठी समितीच्या कार्यालयासमोर व्यासपीठ उभारण्यात आले आहे.
नवरात्रोत्सवाला मंगळवारी सुरुवात होणार आहे. त्यासाठी महालक्ष्मी मंदिरामध्ये जय्यत तयारी सुरू आहे. याअंतर्गत आत्तापर्यंत अंबाबाईच्या पूजेतील चांदीच्या साहित्याची स्वच्छता करण्यात आली. याशिवाय दर्शन रांगा, मांडव, सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी व्यासपीठ उभारणीची कामे पूर्ण झाली आहेत. सुरक्षेकडेही विशेष लक्ष देण्यात आले असून मंदिर परिसरात सीसीटीव्हीची नजर असणार आहे.
दरम्यान, नवरात्रोत्सवाच्या पाश्र्वभूमीवर मंदिराच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने व परिसरातील वाहतूक सुरळीत ठेवण्यासाठी परिसरात सर्व वाहनांना पाìकगसाठी व प्रवेशास बंदी घालण्यात आली आहे. भाविकांना चांगली सुविधा मिळावी या दृष्टीने पोलिसांनी हे नियोजन केले आहे, त्यास सहकार्य करावे, असे आवाहन शहर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक आर. आर. पाटील यांनी केले आहे. देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येत असल्याने मंदिराची सुरक्षा, कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी वाहतुकीचे नियोजन करण्यात आले आहे. त्यामध्ये मंदिर परिसरात शिवाजी चौक ते भवानी मंडप या मार्गावर कोणत्याही वाहनास प्रवेश दिला जाणार नाही. तसेच मंदिर परिसरातील सर्व वाहनतळ इतर ठिकाणी हलविण्यात आले आहेत. हा परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात येणार आहे. या परिसरात वाहन पाìकग करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा