कोल्हापूर : राधानगरी धरणाचा एक दरवाजा उघडला जाऊन पाण्याचा विसर्ग वाढल्याने भीतीयुक्त वातावरण निर्माण झाले असले, तरी घटनेच्या बारा तासानंतरही याबाबत अद्याप नेमक्या कारणाचे निश्चितीकरण झालेले नसल्याने संभ्रम कायम आहे. जलसंपदा विभागाकडून याचा शोध घेतला जात आहे. दरम्यान, राधानगरी धरणाचे तीन सेवाद्वारांपैकी एक द्वार खुले होऊन त्यातून पाण्याचा विसर्ग सुरू झाला. दरवाजा खुला होण्यामागचे नेमके कारण स्पष्ट झालेले नाही, असे जलसंपदा विभागाचे अधीक्षक अभियंता महेश सुर्वे यांनी बुधवारी रात्री म्हटले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कारण अज्ञात

मोटार स्टार्टरमध्ये बिघाड होऊन खुले झाले असण्याची शक्यता कार्यस्थळावर आलेल्या तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. तसेच अज्ञाताकडून किंवा धरण स्थळावर इतरत्र चालू असलेल्या यांत्रिकी कामाच्या मजुराकरवी देखील अनावधानाने स्विच दाबला जाऊन तो खुला झाला असण्याची शक्यता आहे. याबाबत अद्याप नेमक्या कारणाचे निश्चितीकरण झालेले नाही, असे सुर्वे यांनी नमूद केले. 

नदी पाणीपातळीत वाढ

 यांत्रिकी विभागाच्या मदतीने या सेवाद्वाराच्या वरच्या बाजूस असलेले आपत्कालीन द्वार सोडण्यात आले आहे. धरणातून होणारा प्रवाह थांबविण्यात आला आहे. सेवाद्वाराच्या इतर आनुषंगिक दुरुस्तीची कार्यवाही चालू आहे. द्वारातून पाणी सुरू झाल्याने महसूल विभागाच्या मदतीने पंचगंगा नदीच्या व भोगावती नदीच्या काठावरील नागरिकांना सतर्क केले आहे. नदी पात्रातील पातळी वरच्या बाजूस ३ ते ४ फूट तर खालील बाजूस म्हणजेच कोल्हापूरच्या बाजूस १ ते २ फूट वाढली होती. रात्रीनंतर पाणी पातळी पूर्ववत होताना दिसत आहे. सद्य:स्थितीत आपत्कालीन द्वार सोडून प्रवाह थांबविण्यात आलेला आहे. तसेच सेवाद्वार देखील खाली सोडण्याची कार्यवाही युद्धपातळीवर करण्यात येत आहे.