कोल्हापूर : विशाळगडावरील अतिक्रमण हटवण्याची मोहीम मंगळवारी दुसऱ्याही दिवशी सुरूच राहिली. आज मोठ्या घरांवर घाव घालण्यात आला. आतापर्यंत सुमारे शंभर अतिक्रमणे जमीनदोस्त करण्यात आली आहेत.किल्ले विशाळगड येथे गेले काही वर्षे अतिक्रमण वाढत चालली आहेत. ती हटवण्यात यावी अशी मागणी होत आहे. यासाठी रविवारी माजी खासदार संभाजीराजे छत्रपती यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन झाले. आंदोलनाला हिंसक वळण लागले. या आंदोलनाची दखल घेऊन शासनाने अतिक्रमणे हटवण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला दिले होते.
त्यानुसार काल अतिक्रमणे काढण्यास सुरुवात झाली . पहिल्या दिवशी लहान स्वरूपाचे घरे पाडण्यात आली. आज मोठ्या स्वरूपातील अतिक्रमणांवर हातोडा घालण्यात आला. सुमारे ४०० कर्मचारी या मोहिमेमध्ये सहभागी झाले आहेत. सर्व अतिक्रमणे काढल्यानंतर आंदोलन मोहीम थांबवण्यात येणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.