इराणहून आलेल्या त्या तरुणाचा करोना अहवाल निगेटिव्ह आल्याचे मंगळवारी प्रशासनाकडून सांगण्यात आले. यामुळे कोल्हापूरकरांना दिलासा मिळाला आहे. दरम्यान, मुंबई पोलीस प्रमाणे कोल्हापूर जिल्ह्यातील ५५ वयापेक्षा अधिक वयाच्या पोलिसांना बंदोबस्ताएंवजी सामान्य स्वरूपाची कामे देण्याचा निर्णय आज घेण्यात आला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

कोल्हापुरातील चार लोक इराण येथून भारतात १४ मार्च रोजी परत आले होते. त्यांना राजस्थान येथील जैसलमेरमध्ये अलगीकरण केंद्रात ठेवण्यात आले होते. ते शनिवारी कोल्हापुरात परतल्यानंतर प्रशासनाने तत्परतेने त्यांना सीपीआर इस्पितळात दाखल केले होते. तेथे त्यांच्या घशाचा स्त्रावाची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी तिघांचे अहवाल निगेटिव्ह होते. एकाची अहवालाबद्दल शंका होती. त्यामुळे पुन्हा एकदा चाचणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा अहवाल आज प्राप्त झाला असून तो निगेटिव्ह असल्याचे अधिष्ठाता डॉ. मीनाक्षी गजभिये यांनी स्पष्ट केले.

ज्येष्ठ पोलिसांना दिलासा

मुंबईत तीन पोलीस कर्मचाऱ्यांचा करोनामुळे मृत्यू झाल्यानंतर मुंबई पोलीस आयुक्तांनी ५५ वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांनी बंदोबस्तावर येऊ नये. त्यांना पगारी सुट्टी देण्यात येईल, असा निर्णय घेतला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातही अशीच कार्यवाही होणार असल्याचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी मंगळवारी सांगितले. कोल्हापुरात ५० पेक्षा अधिक वयोगटातील ४८० पोलीस कर्मचारी असून त्यांना पूर्वीपासूनच कोणते कर्तव्य द्यायचे ह्य विषयी आदेश काढले आहेत.