राज्यातील महानगरपालिका व नगरपालिका निवडणुकांसाठी बहुसदस्यीय पद्धत रद्द करून ‘एक प्रभाग-एक सदस्य’ याप्रमाणे निवडणुका घ्याव्यात, या मागणीसाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (ए) तर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. मागण्यांचे निवेदन निवासी उपजिल्हाधिकारी शंकर बग्रे यांना सादर करण्यात आले. असा हा निर्णय घेऊन लहान राजकीय पक्षांना एकप्रकारे संपविण्याचाच घाट सरकारने घातला असल्यचा आरोप या वेळी करण्यात आला .
राज्य शासनाने राज्यातील मुंबईवगळता अन्य सर्व महानगरपालिका व नगरपालिका निवडणुका या बहुसदस्यीय पद्धतीने घ्यायचे ठरविले आहे. महानगरपालिकेत एक प्रभाग व चार सदस्य तर नगरपालिकेत एक प्रभाग दोन सदस्य अशी ही रचना असणार आहे. ‘एक प्रभाग-एक सदस्य’ याप्रमाणे निवडणुका घेण्याचा शासनाचा निर्णय प्रस्थापित राजकीय पक्षांना व त्यांच्या धनदांडग्या उमेदवारांना फायदेशीर असा ठरणारा आहे.
लहान राजकीय पक्षांच्या व अपक्ष म्हणून निवडणूक लढविणाऱ्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय करणारा असा आहे. असा हा निर्णय घेऊन लहान राजकीय पक्षांना एकप्रकारे संपविण्याचाच घाट सरकारने घातला आहे. त्याला पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी विरोध केला आहे. आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे, मंगलराव माळगे, शामप्रसाद कांबळे, डॉ. अनिल माने, विलास भामटेकर सहभागी
झाले होते.

Story img Loader