केंद्र व राज्यात मंत्रिपद राहो, विधान परिषद सदस्यपदी वर्णी लागणेही कठीण झाल्याने रिपब्लिकन पक्षाच्या आठवले गटाच्या छावणीत अस्वस्थता निर्माण झाली असली, तरीही या पक्षाला अच्छे दिन आल्याचे दिसू लागले आहे. त्याला तितकीच तारांकित पाश्र्वभूमी असल्याचे नुकतेच करवीर नगरीत पाहायला मिळाले. याचे कारण रिपब्लिकन पक्षाची पुरोगामी विचारांच्या विचारवंत, साहित्यिक यांचा सल्ला घेण्यासाठी येथील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये बठक आयोजित केली होती. या निमित्ताने आठवले यांना भेटण्यासाठी खेडय़ापाडय़ातून आलेल्या सामान्य कार्यकत्यांना पंचतारांकित हॉटेलची सर प्रथमच करण्यात आली.
जे प्रमुख पक्षांना जमले नाही ते दलित, उपेक्षित, वंचित यांचा पक्ष म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आठवले गटाच्या रिपब्लिकन पक्षाने करून दाखवले. ते म्हणजे पंचतारांकित हॉटेलमध्ये कार्यकत्रे आणि विचारवंत यांना जमवणे. पंचतारांकित हॉटेलमधील बठकीचे आयोजन खíचक असले तरी ते आता आठवले गटाच्या आवाक्यातील असल्याचेच यातून दिसून आले.
पंचतारांकित हॉटेलमध्ये मोठय़ा संख्येने आलेल्या कार्यकर्त्यांना आवरणे स्थानिक नेत्यांना कठीण गेल्याने अखेर अशाच वातावरणात पत्रकार परिषद आठवले यांना पार पाडावी लागली. याच वेळी त्यांनी आघाडी शासनाने विश्वासघात केल्यावर विचारवंत, साहित्यिक यांचा सल्ला घेऊन भाजप-सेनेशी हात मिळवणी केल्याचा संदर्भ देऊन आताचेही शासन सत्तेतील वाटा देण्याचा शब्द पाळत नसल्याने गंगाधर पानतावणे यांच्यासह २० विचारवंत, साहित्यिक यांचा सल्ला आजमावून पुढील वाटचाल करणार असल्याचे सांगितले.
परिवर्तनवादी कार्यकर्त्यांचा विरोध
या प्रकारास परिवर्तनवादी कार्यकर्त्यांकडून विरोध होत आहे. भाकपचे रघुनाथ कांबळे म्हणाले, जिल्ह्यात, राज्यात दुष्काळी स्थिती आहे. बेरोजगारीमुळे दलितांना भुकेचा प्रश्न सतावत आहे, तर शासन त्यांच्या खाण्यावर र्निबध आणत आहे. अशावेळी पंचतारांकित हॉटेलमध्ये विचारवंत, साहित्यिक यांचा सल्ला घेण्याऐवजी सभागृहात कार्यकत्र्र्यासमवेत बठक घेणे उचित ठरले असते. पशांची उधळपट्टी टळली असती. दुसरे, आठवले हे भाजपच्या कोटय़ातून खासदार झाले असल्याने त्यांना या बाबी परवडू लागल्या असाव्यात, अशी टपणी त्यांनी केली.

Story img Loader