जिल्ह्यातील माध्यमिक शाळांमधील नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळाली नसल्याने संबंधित मुख्याध्यापकांवर कोणती कारवाई केली, याचा जाब विचारण्यासाठी गुरुवारी जिल्हा रिपब्लिकन सेनेने जिल्हा परिषदेवर मोर्चा काढला, मात्र उत्तर देण्यासाठी जबाबदार अधिकारीच नसल्याने आंदोलकांनी गोंधळ घालत उपाध्यक्षांच्या दालनाची काच फोडली, तर समाजकल्याण अधिकारी, सभापती यांच्या नावाच्या प्लेट फोडल्या. कार्यकर्त्यांनी अचानक घातलेल्या या गोंधळामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ उडाली. शिक्षण विभागाच्या गलथान कारभाराबाबत अधिका-यांना कार्यकर्त्यांनी धारेवर धरले.
जिल्ह्यातील ९वी व १०वीच्या विद्यार्थ्यांना अद्याप शिष्यवृत्ती मिळाली नाही. या विद्यार्थ्यांचे शाळांमधून ऑनलाइन अर्ज भरून देण्याची जबाबदारी मुख्याध्यापकांनी पार पाडली नाही, त्यामुळे त्यांवर कारवाई केली जावी, अशी मागणी यापूर्वी रिपब्लिकन सेनेने केली होती, त्याबाबत मुख्याध्यापकांवर काय कारवाई केली याचा जाब विचारण्यासाठी जितेंद्र कांबळे यांच्या नेतृत्वाखाली कार्यकत्रे जिल्हा परिषदेत आले. या वेळी जिल्हा प्रशासनाच्या निषेधाच्या घोषणा देण्यात आल्या. बंदोबस्तासाठी पोलीसच नसल्याने कार्यकर्त्यांनी थेट आत प्रवेश केला. या वेळी निवेदन घेण्यासाठी संबंधित अधिकारीच जागेवर नसल्याने कार्यकत्रे संतप्त झाले. त्यांनी उपाध्यक्ष शशिकांत खोत यांच्या दालनाची काच फोडून नावाची पाटी फोडली. तसेच समाजकल्याण सभापती किरण कांबळे, समाजकल्याण अधिकारी एस. के. वसारे यांच्याही नावाची पाटी फोडली. घटनेची माहिती मिळताच पोलीस जिल्हा परिषदेमध्ये दाखल झाले. दरम्यान जि.प. सदस्य सुरेश कांबळे यांनी संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढून त्यांना माध्यमिक शिक्षण विभागात नेले. या ठिकाणी अधीक्षक एस. ए. शेख यांना निवेदन देण्यात आले.
अखेर अधीक्षक एस. ए. शेख यांनी संबंधित मुख्याध्यापक, अधिकारी व संघटनेच्या पदाधिका-यांची तत्काळ बठक घेऊन प्रश्न निकाली काढण्याचे आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
आंदोलनात सुरेश कांबळे सतीश वडाम, जितेंद्र कांबळे, राजेंद्र कांबळे, शैलेश कांबळे, समित शिवणगीकर, मनोज िशदे आदींसह कार्यकत्रे सहभागी झाले होते.
महिन्याभरात शिष्यवृत्ती देणार
याबाबत समाजकल्याण विभागाचे अधिकारी एस. के. वसारे यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी शाळांकडून ऑनलाइन अर्ज येत्या पंधरा दिवसांत भरून घेतले जातील आणि महिनाअखेरीपर्यंत सर्व विद्यार्थ्यांना शिष्यवृती देऊ, असे आश्वासन दिले.
रिपब्लिकन सेनेचा कोल्हापूर जिल्हा परिषदेत गोंधळ
कार्यकर्त्यांनी अचानक घातलेल्या या गोंधळामुळे पोलीस प्रशासनाची धावपळ
Written by अपर्णा देगावकर
First published on: 04-12-2015 at 03:30 IST
Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Republican sena distirbance in zp of kolhapur