शाळांची वेळ सहा तासांऐवजी आठ तास करण्याच्या शासनाच्या विचाराधीन असलेल्या प्रस्तावाचा निषेध येथील बालहक्क शिक्षण परिषदेच्या अधिवेशनात करण्यात आला.
येथील राम गणेश गडकरी सभागृहात बालशिक्षण परिषदेचे अधिवेशन आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात शिक्षण विषयक काही महत्त्वाचे ठराव संमत करण्यात आले. त्यामध्ये शिक्षण वेळ आठ तास करण्याच्या प्रस्तावास विरोध, बालशिक्षण देण्यासाठी शिक्षण मंडळाची स्थापना करावी, या मंडळासाठी आíथक तरतूद करण्यात यावी यांचा प्रामुख्याने समावेश होता.
बालहक्क शिक्षण परिषदेच्या अध्यक्षा अलका बियाणी यांनी रचनावादी बालशिक्षणामध्ये पालकांचा सहभाग महत्त्वपूर्ण असल्याचे सांगत पालकांनी कशाप्रकारे योगदान द्यावे याविषयी मार्गदर्शन केले. माजी शिक्षण सहसंचालक संपत गायकवाड यांनी बालहक्क शिक्षण परिषदेला अंगणवाडय़ा जोडल्या जाव्यात, अशी सूचना करुन अंगणवाडी सेविकांना प्रशिक्षण देण्याची जबाबदारी शिक्षण परिषदेकडे सोपवण्याची गरज व्यक्त केली.
या प्रसंगी बालहक्क शिक्षण परिषदेचे मार्गदर्शक रमेश पानसे, माध्यमिक शिक्षण अधिकारी जोत्स्ना िशदे, विस्तार अधिकारी एस. के. यादव, बी. एम. कस्तुरे, प्रभाकर हेरवाडे, बी. बी. टारे आदींसह शिक्षण क्षेत्रातील अभ्यासक, कार्यकत्रे उपस्थित होते.