लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
कोल्हापूर : सांगली येथील माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष विष्णू कदम याच्या तिघांनी केला असून सांगलीतील नितेश दिलीप वराळे, सुरज प्रकाश जाधव यांना पोलिसांनी अटक केली आहे. हा खून आर्थिक देवघेवीतून झाला असल्याचे शुक्रवारी पोलीस तपासून निष्पन्न झाले.
काल कुरुंदवाड येथे संतोष कदम यांचा खून झाल्याचा प्रकार उघडकीस आला होता. कदम हा माहिती अधिकार व सामाजिक कार्यकर्ता असल्याने पोलिसांच्या लेखी हा तपास संवेदनशील होता. पोलिसांनी गतीने तपास सुरू केला.
आणखी वाचा-कोल्हापूरच्या सुपुत्राची युनायटेड किंग्डम सरकारच्या विशेष सल्लागारपदी नियुक्ती
तांत्रिक विश्लेषण आणि सीसीटीव्ही फुटेच्या आधारे सांगलीतून प्रवास करणाऱ्या नितेश वराळे , सुरज जाधव व तुषार भिसे यांनी हा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे.मयत संतोष कदम व संशयित आरोपी नितेश वराळे यांच्यातील आर्थिक वादातून खून झाल्याची प्राथमिक माहिती पुढे आली आहे. कदम याच्यावर सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.