कोल्हापूर : शिरोळ तालुक्यामधील घोसरवाड, दत्तवाड, जुने दानवाड, नवे दानवाड या गावाच्या शेजारून वाहणारी दूधगंगा नदी एप्रिल, मे च्या कडक उन्हाळय़ामुळे कोरडी पडलेली नदी पुन्हा वाहू लागली आहे. नदीपात्रातील पाण्याच्या कमतरतेमुळे सर्व प्रकारच्या उपसा सिंचन योजना चालवण्यास अडचण येत होती. परिसरातील शेतकरी आणि काही गावांमधील पिण्याच्या पाणी योजनांवर मोठा परिणाम झाला होता. त्यामुळे काळम्मावाडी धरणातून नदीपात्रात पाणी सोडण्याबाबत पाटबंधारे विभागाला आदेश द्यावेत अशी मागणी या गावातील नागरिक तसेच शेतकरी बांधवांनी सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील-यड्रावकर यांच्याकडे केली होती. त्यावर यड्रावकर यांनी तातडीने पाटबंधारे विभागाची संपर्क साधत त्या गावांची अडचण संबंधित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिल्यावर काळम्मावाडी धरणातून दूधगंगा नदी पात्रात पाणी सोडण्यात आले. दूधगंगा काठावरील शिरोळ तालुक्यातील शेतकरी व ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा