कोल्हापूर : मुसळधार पावसामुळेकोल्हापुरी जिल्ह्यात जनजीवन विस्कळीत होत चालले आहे. पुराचे पाणी वाढत चालल्याने रस्ते मार्ग बंद झाले आहेत. एसटी वाहतूक विस्कळीत होऊन प्रवाशांची अडचण झाली आहे. नद्यांना पूर आल्याने सतर्कतेचा इशारा दिला असतानाही त्यातून वाहतूक सुरू असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.जिल्ह्याला पावसाचा परिणाम वाहतुकीवर झाला आहे.

कोल्हापूर केर्ली जगबुडी पुलाजवळ मंगळवारी दुपारी पाणी आल्याने रत्नागिरी मार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.सार्वजनिक बांधकाम विभागाकडील जिल्हयातील जिल्हा व राज्य असे २८ रस्तेमार्ग बंद झाले आहेत.अतिवृष्टीचा एसटी सेवेवर बऱ्याच प्रमाणात परिणाम दिसून येत आहे. कोल्हापूर गगनबावडा हा मार्ग पूर्ण बंद झाल्याने कोकण वाहतुकीवर परिणाम झाला आहे. गडहिंग्लज ,कुरुंदवाड आगारात एक ठिकाणी तर आजरा दोन ठिकाणी, चंदगड आठ ठिकाणी वाहतूक पूर्णतः बंद झाली आहे.