कोल्हापूर जिल्ह्याच्या करवीर तालुक्यातील बालिंगा येथे धक्कादायक घटना घडली आहे. येथील एका सराफाच्या दुकानात चार जणांनी दिवसाढवळ्या दरोडा टाकला. गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास हा धक्कादायक प्रकार घडला. या घटनेनं परिसरात भीतीचं वातावरण पसरलं आहे. दरोडेखोरांनी केलेल्या गोळीबारात सराफ दुकाचे मालक आणि त्यांचे नातेवाईक जखमी झाले आहेत. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास केला जात आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

‘टाइम्स ऑफ इंडिया’ने दिलेल्या वृत्तानुसार, दरोडेखोरांनी एक कोटी ८० लाख रुपये किमतीचे दागिने आणि दीड लाख रुपयांची रोकड लंपास केली आहे. या संपूर्ण घटनेचा व्हिडीओ समोर आला असून सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

घटनेच्या दिवशी दुकानात’कात्यायणी ज्वेलर्स’ दुकानाचे मालक रमेश माळी (वय-४०) त्यांचे नातेवाईक जीतू माळी आणि १३ वर्षीय मुलगा पियूष उपस्थित होते. यावेळी सशस्त्र दरोडेखोर दुकानात शिरले. त्यांनी रमेश माळी यांच्यासह त्यांचे नातेवाईक जीतू यांच्यावर गोळीबार केला. यावेळी घाबरलेला मुलगा पियूष दुकानातील ‘स्ट्राँगरुम’मध्ये लपून बसला. त्यामुळे दरोडेखोरांना स्ट्राँगरुममधील दागिने आणि रोकड चोरता आली नाही.

हेही वाचा- पुणे: गौतमी पाटील आक्षेपार्ह ध्वनिचित्रफीत प्रकरण; तरुणाची अटक टळली

या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. आरोपींनी हा दरोडा टाकताना सुमारे दहा गोळ्या झाडल्या आहेत. यातील दोन गोळ्या दुकानाचे मालक रमेश माळी यांना लागल्या आहेत. तर एक गोळी नातेवाईक जीतू माळी यांना लागली आहे. दोघंही गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दुकानाच्या मालकाने दरोडेखोरांचा प्रतिकार केला असता, यातील एका दरोडेखोराने दुकानाच्या मालकावर गोळी झाडली. दरोडेखोर एवढ्यावरच थांबला नाही, तर त्याने दुकान मालकाच्या नरड्यावर पाय देत, लाथाही मारल्या आहेत. या घटनेचा भयावह व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

Kolhapur News (कोल्हापूर न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Robbery at katyayani jwellers in balinga kolhapur gun firing viral video rmm