रोहित पवार हे अजून लहान आहेत. त्यांना अजित पवारांची जागा घ्यायची आहे. त्यांनी कुटुंबातील वाद मिटवायला हवेत, वाढवायला नको होते, असं मंत्री हसन मुश्रीफ यांनी म्हटलं होतं. याला आमदार रोहित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. मी राजकारणात जागा घेण्यासाठी आलो नाही, असं रोहित पवार यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राष्ट्रवादी काँग्रेसची ‘स्वाभिमान सभा’ कोल्हापूरच्या दसरा चौकात पार पडत आहे. तेव्हा रोहित पवार यांनी हसन मुश्रीफ यांच्यावर हल्लाबोल केला. “मी राजकारणात जागा घेण्यासाठी नाहीतर, शिव-शाहू-फुले-आंबेडकरांचा विचार जपण्यासाठी आणि त्याला ताकद देण्यासाठी आलो आहे. प्रतिगामी विचारांना त्याची जागा दाखवण्यासाठी आलो आहे. शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांना भाजपाकडून तडा आणण्याचं काम केलं जात आहे. पण, त्या विचारांना उंचीवर नेण्याचं काम आम्ही करू.”

हेही वाचा : “ईडीची भीती अन् धाक मलाही दाखवला, पण…”, अनिल देशमुखांचं कोल्हापुरात मोठं वक्तव्य

“‘शरद पवार कोल्हापुरात येत असून, एवढ्या छोट्या ठिकाणी का?’ असा सवाल जिल्ह्यातील नेत्यांनी उपस्थित केला. दसरा चौकाला इतिहास आहे. काहीजण दुसऱ्या विचारांकडे गेले आहेत. त्यामुळे शिव-शाहू-फुले-आंबेडकर विचारांची किंमत ते विसरले आहेत. लहानपणापासून मी ऐकलं आहे, कोल्हापूरकरांनी ठरवलं तर, ते करूनच दाखवतात. म्हणून खटक्यावर बोट जागेवर पलटी,” असा इशाराही रोहित पवारांनी हसन मुश्रीफांना दिला आहे.

हेही वाचा : अजित पवारांचे मन वळवण्यात शरद पवारांना यश आले असावे :- नाना पटोले

“सर्वांची उपस्थिती पाहिल्यानंतर कळतं आपला ‘नाद खुळा’ आणि ‘विषय लै हार्ड’ आहे. दसरा चौकाला ऐतिहासिक महत्वं आहे. छत्रपती शाहू महाराजाचं स्मारकही दसरा चौकात आहे. दसरा चौकाच्या आसपास सर्व समाजासाठी हॉस्टेल शाहू महाराजांनी बांधली आहेत,” असेही रोहित पवारांनी सांगितलं.